नागपूर
Nitin Gadkari, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहराच्या वतीने ‘चना पोहा विथ गडकरी’ नावाचा एक विशेष संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवार १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता एनआयटी बगीचा सक्करदरा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागरिकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमात सध्या देशभरातील तरुणाईची ‘क्रश’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री गिरिजा नितीन गडकरींची मुलाखत घेणार आहे.
नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन सादर करण्याच्या उद्देशाने ‘चना पोहा विथ गडकरी’ नावाचा संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘देवाभाऊ विथ तर्री पोहा’ कार्यक्रम यापूर्वीच घेण्यात आला होता. यात प्रसिध्द कलावंत भारत गणेशपुरे आणि स्पृहा जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र यांची मुलाखत घेतली होती. यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागरिकांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.