संक्रांतीला लाडकी बहिणीच्या खात्यात ३ हजार रुपये येणार नाही

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
मुंबई,
mazi ladki bahin yojana राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात १४ आणि १५ जानेवारी रोजी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच या हप्त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे. महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने आचारसंहितेच्या काळात अशा स्वरूपाचा निधी वितरित करणे म्हणजे महिला मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संदर्भात काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवत पत्र पाठवले असून, त्यामुळे या हप्त्याच्या वितरणाला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

mazi ladki bahin yojana
 
 
राजकीय नेत्याचे प्रश्न?
सूत्रांकडून मिळालेल्या mazi ladki bahin yojana  माहितीनुसार, डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा एकत्रित निधी म्हणून तीन हजार रुपये मकर संक्रांतीच्या निमित्ताने १४ जानेवारी रोजी वितरित करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, त्यानंतर लगेचच १५ जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान होणार असल्याने सध्या राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. लोकानुनय करणारे निर्णय आचारसंहितेच्या काळात घेता येत नाहीत, असे नमूद करत महापालिका निवडणूक झाल्यानंतरच ‘लाडकी बहीण’ योजनेचा निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भातील पत्र राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
 
 
अडथळा निर्माण
या पत्रानंतर राजकीय mazi ladki bahin yojana प्रतिक्रिया तीव्र झाल्या आहेत. काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस लाडक्या बहिणींचा द्वेष करत असल्याचा आरोप केला आहे. ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर झाल्यापासून काँग्रेसचा या योजनेविषयीचा राग वारंवार उफाळून येत असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती सरकारने ही योजना सुरू केली तेव्हा काँग्रेसचे पदाधिकारी नागपूर उच्च न्यायालयात गेले होते, याची आठवण करून देत बावनकुळे यांनी मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ नयेत, यासाठीच काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पत्र दिल्याचा आरोप केला. यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
दरम्यान, काँग्रेसने या आरोपांना प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले आहे की, त्यांचा ‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याला विरोध नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर महिला मतदारांना प्रभावित करण्यासाठी सणाचे निमित्त करून निधी वितरित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक पार पडल्यावरच हा हप्ता देण्यात यावा, अशी त्यांची भूमिका असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.या संपूर्ण घडामोडींमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता वेळेवर जमा होणार की निवडणुकीनंतर, याकडे आता राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.