समोर आला 'मास्टर प्लॅन' होणार 'भूकंप'!

सुप्रिया सुळे यांनी दिले संकेत

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
पुणे,
Pune Pimpri Chinchwad राज्यात महापालिका निवडणुकीसाठी राजकीय रणधुमाळी जोर धरली असून पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकत्र येऊन युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पुण्यात पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची औपचारिक घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.या सर्व भूमिकेवर टिका सत्र सुरू आहे.
 
 
Pune Pimpri Chinchwad
पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री Pune Pimpri Chinchwad  अजित पवार यांनी शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यांनी मेट्रो प्रकल्पाच्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसह इतर विकासकामांचे यश सांगितले. अजित पवार म्हणाले की, “पुणे महापालिकेचे दोन्ही प्रतिनिधी आम्ही वन थर्ड प्रतिनिधी आहोत. शहरातील वाहतूक कोंडी, टँकर माफियांचा वाढता प्रश्न यावर आम्ही तयार योजना राबवत आहोत.”
दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजितदादांनी ज्या अनेक गोष्टी यशस्वी करून दाखवल्या आहेत, त्याबाबतचा संपूर्ण प्लॅन आमच्याकडे आहे. पुणे देशातील महत्वाचे शहर आहे, येथे सर्व काही होवू शकते; यासाठी सगळ्यांची इच्छा शक्ती असणे आवश्यक आहे.”संपूर्ण युतीबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ‘ताई आणि दादा मनाने एकत्र आले का? ही पॉलिटिकल एडजस्टमेंट आहे?’ असा प्रश्न येतो, यावर मी फक्त एवढेच सांगते – तुम्हाला जो अर्थ हवा तो घ्या.”
राज्यातील महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी युती भाजपसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी निवडणुकीत राजकीय परिस्थिती लक्षवेधी ठरणार आहे, तर युतीचा प्रभाव शहरातील मतदारांवर कसा पडतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 

 ठाकूर यांचा टोला
आगामी महापालिका Pune Pimpri Chinchwad निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रचाराची धुमधडाक्याने सुरुवात झाली असून सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना जोर मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.अजित पवार यांनी नुकतेच केलेले “जातीय कणा मोडून काढूया” असे विधान यशोमती ठाकूर यांनी “आवडले, पण सत्ताधाऱ्यांच्या दुहेरी भूमिकेवर तीव्र टीका करण्यास भाग पाडले” असे स्पष्ट केले. ठाकूर म्हणाल्या, “जर तुम्हाला खऱ्या अर्थाने हे साध्य करायचे असेल, तर आधी सत्तेतून बाहेर पडा. एकीकडे तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत बसता, सत्तेत आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करता आणि दुसरीकडे भाजपविरोधी भूमिका घेत असल्याचे दाखवता. अशी दुहेरी भूमिका चालणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “तुम्ही खरोखर भाजपचा विरोध करत असाल, तर सत्तेतून बाहेर पडा. एकीकडे सेक्युलर मतदारांना आम्हीच पर्याय आहोत असे सांगायचे आणि दुसरीकडे गुंडगिरी करणाऱ्यांना ‘बघून घेऊ’ अशी भाषा वापरायची, हे योग्य नाही.”अमरावतीतील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “अमरावतीमध्ये गुंडगिरी करणारे लोक तुमच्याच पक्षाचे आहेत. जर तुम्ही म्हणत असाल की जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना आपण बघून घेऊ, तर त्यासाठी आधी सत्तेतून बाहेर पडा.”यशोमती ठाकूर यांच्या या विधानामुळे महापालिका निवडणुकीतील प्रचार रंगतदार बनला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या धोरणावर प्रश्न उपस्थित झाला आहे. आगामी काळात अमरावतीतील राजकीय हालचाली कोणत्या दिशेने जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.