नागपूर,
Jivhala Award 2026 संघाच्या प्रचारकांचे जीवन नेहमीच खडतर असते. पण, दृढनिश्चयानेे ते काम करीत असतात, हे वास्तव शनिवारी नागपुरात आयोजित संघाच्या पंच प्रचारकांच्या संवादातून स्पष्ट झाले. जिव्हाळा परिवारचे आशुतोष फडणवीस, नागेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
जिव्हाळा परिवाराच्यावतीने विलासजी फडणवीस स्मृती जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळा पर्सिस्टंट सिस्टिम्सच्या कविकुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघ शताब्दीनिमित्त केरळमधील वायनाडच्या स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे सचिव पद््मश्री डॉ. धनंजय सगदेव, रा.स्व. संघाचे अ.भा. सहप्रचारक प्रमुख सुनील कुळकर्णी, अ.भा. सहसंपर्क प्रमुख, विवेकानंद केंद्राचे कोषाध्यक्ष प्रवीण दाभोळकर, ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी या प्रचारकांसोबत रवींद्र देशपांडे यांनी संवाद साधला. रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंचालक श्रीधर गाडगे, जिव्हाळा परिवारचे आशुतोष फडणीस व नागेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
हे सर्व प्रचारक नागपुरातून निघाले. रवींद्र भुसारी, सुनील कुळकर्णी, प्रवीण दाभोळकर हे नोकरीचा राजीनामा देऊन तर इतर शिक्षण पूर्ण होताच प्रचारक निघाले. रवींद्र भुसारी म्हणाले, ‘संघाच्या प्रचारकाचे जीवन नेहमीच खडतर असते. दोनवेळच्या जेवणाची त्याची शाश्वती नसते. परंतु कोणत्याही फळाची अपेक्षा करता हा प्रचारक राष्ट्राच्या उभारणीसाठी झटत असतो. धरमपेठ महाविद्यालयात प्राध्यापक होतो. पद्मश्री डॉ. धनंजय सगदेव म्हणाले की, संघाची शिकवण मानव सेवा आहे. या प्रेरणेतून प्रचारक जाण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब देवरस यांनी वायनाड येथे जाण्यास सांगितले. सुरुवातीला भाषा व अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पायाभूत सुविधा नव्हत्या. बèयाचदा मागे वळायचा विचार आला. परंतु संघाचे मानवसेवेचे विचार मनात घट्ट बांधले होते. दृढनिश्चय होता. काम करत राहिलो.
सुनील कुळकर्णी म्हणाले की, संघाचा निष्ठावान प्रचारक होण्यासाठी कोणत्याही प्रेरणेची गरज नाही. नागपुरात राहणारे स्थानिक गृहस्थच माझे प्रेरणास्त्रोत होते. बौद्धिकतेसोबतच त्यांनी मला त्यांचा अमुल वेळही दिलेला आहे. माझ्या जडणघडणीत नागपूरकरांचे मोठे योगदान आहे.प्रवीण दाभोळकर म्हणाले की, विलासजी, श्रीरामजी जोशी आदींसारखे गृहस्थ स्वयंसेवकांच्या प्रेरणेने प्रचारक निघालो. सुनीलजी देशपांडे म्हणाले की, रामनगर परिसरातील शाखेची जबाबदारी असताना तेव्हाची सामाजिक स्थिती व संवेदना बघून प्रचारक निघण्याचा निर्णय घेतला.