...म्हणून थेट 11 लाख रुपये खात्यात येणार!

संजय राऊतांचे "चॅलेंज"

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
मुंबई,
sanjay raut आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून विकास विरुद्ध धर्माचे राजकारण असा वाद अधिक तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना विकासावर चर्चा करण्याचे आव्हान दिल्यानंतर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर देत थेट 11  लाख रुपयांचे खुले आव्हान फडणवीसांना दिले आहे.
 

sanjay raut  
भाजपने धार्मिक मुद्द्यांचा आधार न घेता निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी दिले होते. त्या वेळी त्यांनी एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. याच मुद्द्यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी ही रक्कम वाढवत, उद्धव ठाकरेंचे एक लाख आणि स्वतःचे दहा लाख मिळून एकूण ११ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. देवेंद्र फडणवीस स्वतःला शूर आणि महान नेता समजत असतील, तर त्यांनी हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तानसारख्या विषयांशिवाय निवडणूक लढवून दाखवावी, असे राऊत म्हणाले.
 
 
मुंबई महापालिका sanjay raut निवडणुकीत रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना, भाजप धार्मिक मुद्दे पुढे करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. अयोध्या, ‘जय श्रीराम’ किंवा बाबरी मशीद यांसारख्या घोषणांपेक्षा मुंबईतील नागरिकांना रोजच्या समस्यांची उत्तरे हवी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.मुंबईच्या विकासाबाबत बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कामगिरीचा उल्लेख केला. आज मुंबईत उभे असलेले ५६ पेक्षा अधिक उड्डाणपूल आणि मोठे पायाभूत प्रकल्प हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून सुरू झालेल्या विकासाची फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळात देवेंद्र फडणवीसही सोबतच होते, त्यामुळे शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय चोरू नये, असा टोला त्यांनी लगावला.मराठी माणसाचे हक्क जपणे आणि त्याला ताठ मानेने जगता येईल, अशी परिस्थिती निर्माण करणे हाच खरा विकास असल्याचे राऊत यांनी नमूद केले. मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा असताना खोटे आरोप करणे शोभत नसल्याचे सांगत, जे काम झाले आहे ते मान्य करावे आणि जे झाले नाही ते प्रामाणिकपणे स्वीकारावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
पक्षनिधीसाठी हवे असतील तर हे ११ लाख रुपये कधीही घेऊन जावेत, मात्र त्याआधी धार्मिक ध्रुवीकरणाशिवाय निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवावी, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे. या आव्हानामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.