जप्त रेती घरकुल लाभार्थींना द्या

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
नागपूर, 
nagpur-news : शासनाची रॉयल्टी बुडवून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जाते. यावर महसूल आणि पोलिस खात्यामार्फत धाड टाकून ती रेती जप्त केली जाते. अशाच स्वरूपाची कारवाई करीत रामटेक तहसील कार्यालयाच्या पुढील भागात पोलिस वसाहतीच्या मैदानावर जप्त करण्यात आलेली रेती ठेवली आहे. हीच रेती आता जाणाèया येणाèयांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.
 
 
JK
 
 
 
यावर उपाय म्हणून ती जप्त रेती घरकुलाच्या लाभार्थींना दिल्यास नक्कीच सर्वांनाच दिलासा मिळेल. अशा स्वरूपाचा उपाय नगरसेवक तथा प्रख्यात समाजसेवक सुमित कोठारी यांनी सुचविला आहे. त्यांनी शनिवार 10 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना भेटून या गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयाकडे लक्ष वेधले आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेश किंमतकर, अनिल वाघमारे, प्रणय सोमनाथे, इम्रान कयूम कुरेशी उपस्थित होते.
 
 
तस्करांकडून जप्त केलेली रेती ज्या मैदानावर ठेवली, त्याच्या बाजूनेच रस्ता आहे. हा वर्दळीचा मार्ग असून, ती रेती रस्त्यावर येते. यामुळे हा भाग आता रेतीमुळे अपघातप्रवण बनला आहे. शिवाय रेती रस्त्यावर आल्याने दुचाकी वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. हे आपणहून ओढवून घेतलेले संकट लोकांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याची भयावह स्थिती नगरसेवक सुमित कोठारी यांनी जिल्हाधिकाèयांना पटवून दिली. विशेष म्हणजे रेती जप्त करून ती मैदानावर ठेवली. आता या भागात शासकीय कार्यालये भरपूर आहेत. त्या कार्यालयात येणाèयांच्या वाहनांना ठेवण्यासाठी जागा नाही. मात्र जप्त केलेली रेती पडून आहे. तिचा सुयोग्य वापर झाल्यास घरकुलाचे लाभार्थी लाभात राहतील अन् शासनालाही काही चांगले कार्य केले त्याचे समाधान मिळेल. जप्त रेतीची योग्य विल्हेवाट लावल्यास लोकांना वाहने ठेवण्यासाठी जागा मिळेल. पार्किंगची समस्याही सुटेल असेही सुमित कोठारी यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सांगितले.