विलासजींचे जीवन सर्वांनी समजून घेण्याची गरज

-जिव्हाळा पुरस्कार वितरण

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
नागपूर,
RSS विलासजींचे जीवन सर्वांनी विशेषतः नव्या पिढीने समजून घेण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी केले.संघ शताब्दीनिमित्त विलासजी फडणवीस स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्रीधर गाडगे बोलत होते.
 

RSS 
केरळमधील RSS वायनाडच्या स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे सचिव पद््मश्री डॉ. धनंजय सगदेव, रा.स्व. संघाचे अ.भा. सहप्रचारक प्रमुख सुनील कुळकर्णी, अ.भा. सहसंपर्क प्रमुख, विवेकानंद केंद्राचे कोषाध्यक्ष प्रवीण दाभोळकर, ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी तसेच रवींद्र देशपांडे, जिव्हाळा परिवारचे आशुतोष फडणवीस, नागेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.श्रीधर गाडगे म्हणाले की, विलासजी फडणवीस हे दीपस्तंभासारखे होते. विलासजींमधील अलौकिकत्व दिसलं, ते अनुभवून उपस्थित पाचहीजण राष्ट्रसेवेत निमग्न झालेे. विलासजींमध्ये जिव्हाळा आधीपासूनच होता. पुरस्कार नंतर सुुरू झाला. विलासजींचे कर्तृत्व पहाडासारखे होते. विलासजी सूर्यासारखे प्रकाश देणारे, ऊर्जा देणारे, सगळ्यांना मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ होते.
 
 
संघ शताब्दी निमित्ताने पंच RSS परिवर्तनावर काम करणाèया व्यक्तींना जिव्हाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समरसतेसाठी भंते अभयनायक थेरा यांना सुनील देशपांडे यांच्या हस्ते, स्वदेशीसाठी सुरेश पितळे यांना प्रवीण दाभोळकर यांच्या हस्ते, कुटुंब प्रबोधनासाठी सीमा घाटे यांना डॉ. धनंजय सगदेव यांच्या हस्ते, पर्यावरणासाठी सचिन नायडू यांना सुनील कुळकर्णी यांच्या हस्ते नागरी कर्तव्यासाठी रवींद्र परांजपे यांना रवींद्र भुसारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
 
श्रीरामाची मूर्ती, मानपत्र, विलासजींवरील पुस्तक व रोख 51 हजार, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मानपत्रांचे वाचन श्रद्धा भारद्वाज, डॉ. अभिजित अंभईकर, गौरी बेलन, डॉ. सीमा देशपांडे, रूपा फडणवीस, भाग्यश्री देशकर यांनी केले. प्रास्ताविक आशुतोष फडणवीस यांनी केले.
यावेळी अनेक मान्यवरांची भरगच्च उपस्थिती होती.