भाविकांवर मधमाशांचा हल्ला

*तीन जखमी : सेवाग्राम रुग्णालयात दाखल

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
bee-attack : भजनाकरिता गेलेल्या महिला व पुरुषांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे जखमी झाले. ही घटना शनिवार १० रोजी देऊळगाव येथे घडली असून जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
bee
 
 
 
देऊळगाव येथील आठ ते दहा महिला-पुरुष जवळच असलेल्या आई मंदिरामध्ये भजनाकरिता गेले होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास मंदिराजवळ असलेल्या झाडावरील शेकडोच्या संख्येने मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये देऊळगाव येथील भारगोजी नैताम, सुलोचना खेकडे, माधुरी देशमुख हे जखमी झाले. भजन मंडळातील उर्वरित लोकांनी वेळीच पळ काढल्याने त्यांना कुठलीही इजा झाली नाही. यात सुलोचना खेकडे यांना मोठ्या प्रमाणावर मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तिघांनाही सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.