हरभरा पिकावर ‘मर’रोगाचा प्रकोप, प्रादुर्भाव वाढला

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
wilt-disease : तालुक्यातील अनेक गावांमध्ये यंदा हरभरा पिकावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतांमध्ये उभे असलेले हरभèयाचे पिक अचानक वाळू लागल्याने शेतकèयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणबेहळ, जवळा, बोरगाव, आर्णी, परिसरातील तसेच तालुक्यातील बहुतांश शेतात ठिकठिकाणी हरभरा पिकाची झाडे पिवळी पडून मुळापासून वाळत आहेत. पेरणीनंतर पीक चांगल्या अवस्थेत असताना अचानक मर रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकèयांत व्यक्त होत आहे.
 
 
 
y11Jan-Harbhara
 
 
 
विशेषतः जमिनीत ओलावा असूनही झाडे कोमेजून वाळत आहेत. हा रोग जमिनीतून पसरणारा असल्याने एका शेतातून दुसèया शेतात वेगाने पसरत असल्याचे शेतकèयांनी सांगितले. कृषीतज्ज्ञांच्या मते, हवामानातील बदल, जमिनीत असलेले बुरशीजन्य जंतू तसेच एकाच पिकाची सतत लागवड ही मर रोगाची प्रमुख कारणे असू शकतात. बाधित पिकांची कृषी विभागाने शेतात पाहणी करून मार्गदर्शन करावे व तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, रोग नियंत्रणासाठी योग्य औषधोपचार व मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी शेतकèयांकडून होत आहे. तरी प्रशासनाने तातडीने पाहणी करून शेतकèयांना दिलासा द्यावा, अशी मागणी जवळा येथील शेतकरी मंगेश गुल्हाने यांनी केली आहे.