गोंदियाच्या मुंडीपार-देवरी मार्गावर बर्निंग ट्रेलरचा थरार (video)

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
गोंदिया,
burning trailer गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार-देवरी मार्गावरील कमरगाव येथील बस स्थानक परिसरात बर्निंग ट्रेलरचा थरार बघायला मिळाला. हा ट्रेलर नवीन क्रेन घेऊन देवरीच्या दिशेने जात असताना कमरगाव येथील बसस्थानकावर थांबला असता अचानक आग लागली.
 
 
 
बर्निंग
 
ही घटना रविवारी ११ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. यात ट्रेलर पूर्णतः जळून खाक झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी यात ट्रेलर मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.burning trailer घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत ट्रेलर पूर्णतः जळून खाक झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही.