संवाद सेतू उपक्रमांतर्गत कृषी कर्मचारी शेतकर्‍यांच्या भेटीला

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
मानोरा,
agriculture employees तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाचा संवाद सेतू कार्यक्रमाचे आयोजन तालुयात ठीक ठिकाणी करण्यात येत आहे. कृषी विभाग म्हणजे शेतकर्‍यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडली गेलेली सर्वात मोठी यंत्रणा आहे. मुख्यालयातील अधिकारी वगळता जवळपास दहा हजार सहाय्यक अधिकारी गाव पातळीवर प्रत्यक्ष उपलब्ध आहेत. कृषी अधिकारी विविध कारणांसाठी शेतकर्‍यांच्या भेटीगाठी घेत असतात.
 

agriculture employees 
परंतु त्यासाठी शेतीशाळा, चर्चासत्रे किंवा मोका तपासणी या कामांचे निमित्त असते. कामाचा एक भाग म्हणून या भेटीगाठी होतात मात्र त्यातून पुरेशा संवाद साधला जात नाही. यासाठी राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्ष असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी नव्या वर्षात संवाद सेतू उपक्रम राबविणेबाबत आयुक्त कृषी यांनी आवाहन केले आहे. या उपक्रमांतर्गत शेतकर्‍यांशी मुक्त संवाद साधता यावा या सामाजिक हेतूने व पालक यंत्रणा म्हणून शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्यांच्याकडून अपेक्षा, मार्गदर्शन, सूचना व अभिनव कल्पना घेऊन विभागाचे कामकाजामध्ये सुधारणा करणे व कृषी विभाग व शेतकर्‍यामधील नाते अधिक घट्ट करण्याचे उद्दिष्ट आहे.
गिरोली येथे स्थानिक बुद्ध विहार मध्ये सदर उपक्रम अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी तालुका कृषी अधिकारी रोशन भागवत व मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड आणि सहाय्यक कृषी अधिकारी संतोष पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कपाशी पिकाचे फरदड निर्मूलन करणेबाबत आवाहन करण्यात आले तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध बाबींचे अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.