बजाजनगर जेष्ठ नागरिकांचा ४२ वा उत्सव

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Bajajnagar जेष्ठ नागरिक मंडळ, बजाजनगर (पश्चिम) चा ४२ वा वार्षिक उत्सव ज्ञानेश्वर मंदिर, बजाजनगर येथे यशस्वीपणे साजरा झाला. अध्यक्षस्थानी डॉ. भारती सुदामे होत्या. मंडळाचे उपाध्यक्ष विनायक प्रभूणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सचिव मृदुला पंडित यांनी मंडळाचा इतिवृत्त सादर केला. सरस्वती वंदना वैशाली पत्तरकिने यांनी सादर केली.
 
Bajajnagar
 
डॉ. सुदामे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आपल्यातील स्व-चेतना ओळखा आणि येणाऱ्या परिस्थितीत आनंदात रहा.” उत्सवात वयाच्या ७५ वर्षे, ८० वर्षे पूर्ण केलेल्या तसेच विवाहाच्या ५० वर्षांची गाठ भरलेल्या जेष्ठ सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. Bajajnagar यावेळी अजित परुळकर यांनी आभार प्रदर्शन केले. वंदेमातरम शैला गोवर्धन यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल मंडले यांनी केले.
सौजन्य: मृदुला पंडित, संपर्क मित्र