जयस्तंभ चौक जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ वंदना व महाआराती

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
बुलढाणा,
Buldhana, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथील जिजाऊ स्मारकाजवळ भव्य जिजाऊ वंदना व छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती हजारो शिवप्रेमी, माता-भगिनींच्या साक्षीने संपन्न झाली.
 

  Buldhana, 
हा सोहळा आ. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपालिकेचे गटनेते युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडला. चंदीगड येथून भ्रमणध्वनीद्वारे आ. संजय गायकवाड यांनी जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा देत शिवप्रेमींशी संवाद साधला. जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार, त्याग व राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन शिवरायांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार या निमित्ताने सर्वांनी व्यक्त केला. याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.