नागपूर,
Nandanvan Library लायन्स क्लब नागपूर सेवन स्टारच्या वतीने नंदनवन वाचनालय येथे ‘राजमाता जिजाऊ व युवाप्रणेते स्वामी विवेकानंद जयंती’ उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना लायन्स क्लब नागपूर सेवन स्टारचे सचिव व शिवछत्रपती राज्य युवा पुरस्कारार्थी ॲड. डॉ. शांतीदास लुंगे यांनी, “आजच्या युवाशक्तीने राजमाता जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीसाठी केलेल्या धैर्यपूर्ण प्रयत्नांचे तसेच स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण विश्वात भारतीय संस्कृतीची पताका फडकावण्यासाठी केलेल्या कार्याचे स्मरण ठेवून आत्मविकास साधावा,” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्मिता उराडे (ग्रंथपाल) यांनी केले, तर आभार प्रदर्शन सोपान धारगावे (लिपिक) यांनी केले.

यावेळी लायन्स क्लबचे ॲड. सुमित सिन्हा, ॲड. अतुल जोशी, ॲड. अजित दामले, ॲड. दिनेश दुवा, ॲड. डॉ. अशोक पवार, ॲड. मुकुल पंडित यांच्यासह नंदनवन वाचनालयाचे सतीश कुकडे, जयप्रकाश फुटाणे, सोनाली सोनारे, किरण ढोबळे, मनीषा निखाडे, विलास मानकर, Nandanvan Library रितेश निरडकर, चंदू सूर्यवंशी, अनिकेत चांदेकर, युगंधर नंदनवार, निपुण रामटेके, विराज भरतवाडे, पुरुषोत्तम डोंबले, मंथन गुरुमुले, सानिध्य रघटाटे, अर्जुन चंद्रवंशी, रश्मी मस्के, तनुश्री धनकाटे, मीनल धांडे, सानिया धनविजय, रंजिताकुमारी, पार्वती करसपल्ली, कशिश नारनवरे आदी पदाधिकारी, वाचक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: शांतीदास लुंगे, संपर्क मित्र