'या' तारखेला 'ड्राय डे' तळीरामाचा गळा कोरडा पडणार !

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
मुंबई
Liquor ban during elections महाराष्ट्रात येत्या काळात होऊ घातलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक रणधुमाळीत जोरदार तयारी केली असून सोशल मीडिया, रोड शो, सभा आणि बैठकींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार हा प्रचार उद्या, मंगळवार 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता थांबणार आहे.
 
 

Liquor ban during elections
 
 
निवडणूक प्रक्रियेचा Liquor ban during elections पुढील टप्पा 15 जानेवारी रोजी मतदानाने पार पडणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या संपूर्ण कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी राज्य शासनाने कठोर नियम लागू केले आहेत. त्यानुसार 13 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत संबंधित महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ड्राय डे लागू करण्यात आला आहे.
 
 
ड्राय डेच्या कालावधीत निवडणूक Liquor ban during elections होणाऱ्या 29 महानगरपालिकांच्या हद्दीत दारूची सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.या निर्बंधांचा प्रभाव मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांसह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांवर राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा सज्ज असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.दरम्यान, प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने आज राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. उद्या सायंकाळनंतर प्रचार थांबून मतदार शांतपणे विचार करून मतदान करतील, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांचे निकाल 16 जानेवारी रोजी स्पष्ट होणार असून त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.