देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी महिला आक्रमक !

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार; आंदोलनाचा इशारा

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
रिसोड,
local alcohol shop protest शहरातील इंदिरानगर, लोणी रोड येथील देशी दारूचे दुकान तत्काळ हटवावे, या मागणीसाठी महिलांसह नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून, न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही महिलांनी दिला.
 

local alcohol shop protest  
निवेदनानुसार, इंदिरानगरमधील मुख्य रस्त्यालगत अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान सुरू असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा, शिवीगाळ, भांडणे केली जात असल्याने महिलांना व विशेषतः शाळकरी मुला-मुलींना ये-जा करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुकानामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून, परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या दुकानापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर शाळा, हॉस्पिटल व प्रसूतिगृह, मेडिकल, तसेच मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आणि अन्य वसतिगृह आहेत. त्यामुळे या मार्गावरून विद्यार्थी-विद्यार्थिनी व महिलांची सतत ये-जा असते. त्यामुळे ३० दिवसांच्या आत हे दुकान हटविण्यात यावे, अन्यथा दुकानासमोर ठिय्या आंदोलन व बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. निवेदनावर सदानंद चोपडे, सुनील गवई, डॉ. अशोक इंगोले, शेख मुजाहीद शेख मुनाफ, सर्वजित शेळके यांच्यासह महिलांच्या स्वाक्षरी आहेत.