मोठी बातमी! महाराष्ट्रातील शाळा पाच दिवस बंद?

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra election 2026 महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानानिमित्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने या दिवसाला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीचा परिणाम शाळा, कार्यालये, बँका, महानगरपालिका आणि सार्वजनिक क्षेत्रातील विविध उपक्रमांवर होईल.
 

Maharashtra school holidays, Maharashtra election 2026 
राज्यातील बहुतेक Maharashtra election 2026 शाळांना या आठवड्यात अतिरिक्त सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. १५ जानेवारी रोजी मतदानासाठी अनेक ठिकाणी शाळांमध्ये मतदान केंद्र सुरू केले जात आहेत, त्यामुळे या दिवशी शाळांमध्ये शिक्षण नाही. तसेच, शिक्षण विकास मंचाचे समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांच्या मागणीनुसार, मतदानात काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीला विशेष पगारी विश्रांती दिली जावी, अशी मागणी केली गेली आहे.
 
 
मतदानाची प्रक्रिया संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असली तरी त्यानंतरही निवडणूक कार्यालयांमध्ये ईव्हीएम सील करणे, आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे आणि अहवाल सादर करणे यासारखी कामे उशिरापर्यंत चालते. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी नियमित शाळेत हजर राहणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरते. यामुळे १६ जानेवारीला सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली आहे.याआधीच १४ जानेवारीला मकर संक्रांतीची सुट्टी असल्याने, १५ जानेवारीला मतदानाची सुट्टी आणि १६ जानेवारीला विशेष सुट्टी जाहीर झाल्यास विद्यार्थी सलग पाच दिवस शाळेत जाणार नाहीत. १७ जानेवारी शनिवार आणि १८ जानेवारी रविवार असल्याने मुलांना सलग पाच दिवस सुट्टी मिळण्याची परिस्थिती निर्माण होईल.
 
 
महाराष्ट्रातील प्रमुख महानगरांमध्ये Maharashtra election 2026 मतदानाचा निकाल ठरविण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये मतदान होणार आहे. तसेच, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर येथे देखील मतदानाचे केंद्र उभारले जात आहेत.विद्यार्थी आणि पालकांनी याप्रसंगी शाळांच्या सुट्टीची माहिती आधीपासूनच मिळवून शिक्षण व घरगुती नियोजन व्यवस्थित करण्याची गरज आहे.