मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन
बजरंग नगरात झाली जाहीर सभा
अमरावती,
Mayor of Amravatiलोकसभा निवडणुकीत अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्यावर राजकमल चौकात पिवळी माती उधळून धिंगाणा घालण्यात आला. त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर महापालिकेत केवळ हिंदू महापैारच आपल्याला बसवावा लागेल. त्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. देव, देश व धर्मासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन मत्सविकास मंत्री निलेश राणे यांनी केले.
Mayor of Amravati महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी सांयकाळी बजरंग नगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, आमदार संजय कुटे, आमदार राजेश वानखडे, माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर, माजी शहराध्यक्ष किरण पातूरकर, सिद्धार्थ वानखडे उपस्थित होते. नितेश राणे पुढे म्हणाले, भाजप ही राष्ट्रभक्त संघटना आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर अयोध्येत राम मंदिर झाले, कलम ३७० रद्द झाले. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असोद्दीन ओवैसी यांच्यावर टीका करीत ते म्हणाले, ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मानतात की कुराण हे त्यांनी स्पष्ट करावे. युवा स्वाभीमान पक्षाचे नेते रवी राणा यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख न करता नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, त्यांचा पाना ठीक करण्यात आला आहे. आता तो त्यांनी कुठेही चालवू नये, नाहीतर गाडी बंद पडेल. तू नीट आहे तोपर्यंत ठीक आहे, आमच्या नादी लागू नको असा गर्भीत इशारा त्यांनी दिला.