"माझे पाय कापून टाका, मी मुंबईत येत आहे," ठाकरेंच्या धमकीला अण्णामलाईंचे प्रत्युत्तर

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
मुंबई,   
annamalais-reply-to-thackerays-threat महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘रसमलाई’ आणि ‘पाय कापण्याच्या’ विधानांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांनंतर आणि मनसे कार्यकर्त्यांकडून आलेल्या धमक्यांवर भाजपा नेते के. अण्णामलाई यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. “मी धमक्यांना घाबरणारा माणूस नाही; मी शेतकऱ्याचा मुलगा आहे,” असे ठणकावून सांगत त्यांनी थेट आव्हान दिले.
 
annamalais-reply-to-thackerays-threat
 
चेन्नई येथे माध्यमांशी बोलताना अण्णामलाई यांनी मनसे आणि राज ठाकरे यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “मी मुंबईत नक्की येणार आहे. जर खरंच हिंमत असेल, तर माझे पाय कापून दाखवा,” असे म्हणत त्यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या धमक्यांना खुले आव्हान दिले. मला धमकावणारे राज ठाकरे किंवा आदित्य ठाकरे नेमके कोण, असा सवाल करत त्यांनी या प्रकाराला लोकशाहीविरोधी ठरवले. मी शेतकरी कुटुंबातून आलेलो असल्याचा अभिमान व्यक्त करत अण्णामलाई म्हणाले की, अशा धमक्यांपुढे झुकणे हा त्यांच्या स्वभावात नाही. मनसेकडून होत असलेले आंदोलन आणि विधाने ही अज्ञानातून येत असल्याची टीका त्यांनी केली. केवळ शिवीगाळ करण्यासाठी खास सभा घेतल्या जात आहेत, यावरूनच आपले महत्त्व वाढत असल्याचे त्यांनी उपरोधाने सांगितले. “मी घाबरलो असतो, तर गावातच बसलो असतो; पण मुंबईसारख्या जागतिक शहरात येण्यापासून मी मागे हटणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. annamalais-reply-to-thackerays-threat या वादाची ठिणगी राज ठाकरे यांच्या अण्णामलाईंवरील ‘रसमलाई’ या वक्तव्यातून पडली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अण्णामलाई मुंबईत आले, तर पाय कापण्याची धमकी दिल्याने वातावरण अधिकच तापले. या पार्श्वभूमीवर अण्णामलाईंनी तीव्र प्रतिक्रिया देत आपली भूमिका ठामपणे मांडली.
दरम्यान, हा राजकीय संघर्ष वैयक्तिक आरोपांपुरता मर्यादित राहिला नाही. राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करत एक नकाशा दाखवला आणि गेल्या दहा वर्षांत एकाच उद्योगपतीची संपत्ती वाढल्याचा दावा केला. यावर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सोशल मीडियावर राज ठाकरे आणि अदानी यांचा जुना फोटो शेअर करत पलटवार केला. एकीकडे भेटीगाठी आणि दुसरीकडे आरोप, हा दुटप्पीपणा असल्याची टीका भाजपने केली आहे. अण्णामलाई यांनी आपल्या बाजूने बोलताना सांगितले की, त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. annamalais-reply-to-thackerays-threat मुंबईला जागतिक दर्जाचे शहर म्हणणे म्हणजे मराठी समाजाच्या योगदानाला नाकारणे नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. “जसे कामराज यांना महान भारतीय नेता म्हणल्याने त्यांची तमिळ ओळख कमी होत नाही, तसेच मुंबईचे कौतुक करणे कोणत्याही भाषा किंवा संस्कृतीविरोधात नाही,” असे उदाहरण देत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. आगामी बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, महाराष्ट्राच्या राजकारणात याचे मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.