नागपूर,
Odisha to Madhya Pradesh drug smuggling ओडिशातून मध्यप्रदेशकडे सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जोरदार कारवाई केली आहे. सावनेरजवळील भागीमहारी टोल प्लाझावर एका ट्रकमधून तब्बल ५२२ किलो गांजा जप्त केला गेला आहे. या गांजाची बाजारभावानुसार किंमत अंदाजे २ कोटी ६१ लाख रुपये आहे.
डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ओडिशातून छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गे मध्यप्रदेशात गांजाची मोठी खेप पाठवली जात होती. याच्या आधारे पथकाने रविवारी पहाटे सुमारे ५ वाजता सावनेर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. संशयित ट्रक (एमपी ०४ जीबी ३८५९) येताच तो थांबवून तपासणी करण्यात आली.तपासादरम्यान लक्षात आले की, ट्रकमध्ये कूलर, फॅन, ब्लँकेट आणि जॅकेट्स यासारखा सामान होता. मात्र या साहित्याच्या आड सखोलपणे गांजा लपवण्यात आला होता. तपासणीत ५२२ किलो गांजा सापडल्यावर तत्काळ तो जप्त करण्यात आला.डीआरआयने ट्रकचालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून, न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनाही दोन दिवसांचा पोलीस रिमांड मंजूर झाला आहे. आरोपी ओडिशाचे रहिवासी असून त्यांचे वय ३५ ते ४० वर्षांदरम्यान आहे.
स्रोतांच्या Odisha to Madhya Pradesh drug smuggling माहितीनुसार, या कारवाईतून ओडिशातून आंतरराज्यीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर चाललेल्या गांजा तस्करी नेटवर्कचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे. डीआरआयचे पथक सध्या या प्रकरणात सखोल तपास करत असून, आणखी आरोपींना अटक होऊ शकते.
यापूर्वी डीआरआयनं वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे सुमारे १९२ कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला होता. त्या कारवाईनंतर आता नागपूर जिल्ह्यातील या धडक कारवाईमुळे डीआरआयच्या तस्करी विरोधातील प्रयत्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.