वर्धा,
Prahar Shikshak Sanghatana शिक्षकांचा मान- सन्मान गहाण ठेवून भटके श्वा मोजण्याचे काम शिक्षकांकडे सोपविण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहे. हे काम शिक्षकांच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारे असल्याने राज्यातील कोणत्याही शिक्षकांनी हे काम स्वीकारू नये. त्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले.
सर्वोच्च न्यायालयाने Prahar Shikshak Sanghatana सरकारला भटया श्वानांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले आहेत. या कामात नोडल अधिकारी म्हणून मुख्याध्यापक तथा शिक्षकांची नेमणूक करण्यात येत असून भटया श्वानांचा वावर कमी करण्याची जबाबदारी देण्यात येत आहे. भटके श्वान कमी करण्याचे किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिकांचे आहे. परंतु, प्रशासनातील अपयश झाकण्यासाठी आता हे काम शिक्षकांच्या माथी मारण्याचे काम सुरू झाले आहे. प्रत्यक्षात शाळेतील अध्यापनाचे काम वगळता प्रत्येक शाळा बाह्य कामात शिक्षकांना जुंपण्याचे काम सातत्याने होत आहे. त्याचा विपरित परिणाम अनुदानित मराठी माध्यमांच्या शाळेवर पडत आहे. शिक्षकांना पुन्हा श्वानांचे मोजमाप करण्याची, देखरेख करण्याचे काम देऊन अपमानित करण्यात येत आहे. श्वानांची काळजी शिक्षकांनी घ्यायची मग गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांची काळजी कोणी घ्यायची? असा प्रश्न देखील भोयर यांनी उपस्थित केलेला आहे.
हे आदेश तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर शिक्षकांचा आक्रोश दिसून येईल, असा इशाराही प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.