वचपा काढण्यासाठी दुचाकींना पेटवले

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
पुलगाव येथील घटना : दोघांवर गुन्हा दाखल
पुलगाव, 
Pulgaon incident माहेरी परतलेल्या पत्नीच्या ताब्यातील मुलांना घेण्यासाठी आलेल्याने वादाचा वचपा काढण्यासाठी चक घराच्या आवारात असलेल्या दुचाकींना आगीच्या हवाली केले. ही घटना ११ रोजी जुना पुलगाव परिसरात घडली. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
 
 
fir
 
Pulgaon incident जुना पुलगाव येथील रहिवासी बहादुरसिंग खुनसिंग बावरी यांच्या मोठ्या वडिलांची मुलगी सिमरन ही पतीशी घरगुती कारणामुळे वाद झाल्याने पुलगाव येथे माहेरी परतली. १० जानेवारीला सिमरनचा पती लक्ष्मणसिंग भादा व सिकंदरसिंग भादा दोन्ही रा. आर्वी हे पुलगावला आले. लक्ष्मणसिंग भादा याने पत्नीला तु तुझ्या वडिलांकडेच रहा, पण मला माझ्या मुलांना घेऊन जाऊ दे, असे सांगितले.
 
Pulgaon incident  चर्चे दरम्यान सिमरनच्या वडिलांनी मध्यस्ती करून वाद निवळण्याचा प्रयत्न केला. पण, लक्ष्मणसिंग भादा व सिकंदरसिंग भादा हे दोघेही शिवीगाळ करीत तेथून निघून गेले. त्यानंतर मध्यरात्री घराच्या आवारातील श्वान जोरजोराने भुंकत असल्याचे लक्षात आल्याने बहादुरसिंग बावरी हे जागे झाले. त्यांनी घराबाहेर येऊन पाहणी केली असता त्यांच्या घराच्या आवारातील दोन दुचाकी जळत होत्या. शिवाय लक्ष्मणसिंग भादा व सिकंदरसिंग भादा हे तेथून पळताना दिले. त्यांनीच दुचाकींना आगीच्या हवाली केल्याने बहादुरसिंग बावरी यांचे २० हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पुलगाव पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी तक्रारीवरून लक्ष्मणसिंग भादा व सिकंदरसिंग भादा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.