राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमीत्त स्वदेशी संकल्प दौड मॅरेथॉन स्पर्धा

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
बुलढाणा,
Swadeshi Sankalp Run राष्ट्रभक्तीचा प्रगट अविष्कार म्हणजे स्वदेशी-भाव होय. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृती, राष्ट्रीय अस्मीता, प्रखर राष्ट्राभिमान, चिरकाल टिकविण्यासाठी सर्वांनीच स्वदेशी जीवन शैलीचा स्वीकार करावा. भारताला स्वावलंबी, आत्मनिर्भर, संपुर्ण विकसित विश्व विजेता करण्यासाठी स्वदेशी भाव-जागरण हा मुलमंत्र आहे. राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमीत्त भारतमातेला विश्व गुरुपदी पोहचविण्याचा भारतीय युवक-युवतीं वर्गाने कृती युक्त संकल्प करणे हेच खरे राष्ट्र पुरुषांना अभिवादन ठरेल. असे आवाहन स्वदेश जागरण मंचाचे पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री मनोहरलाल अग्रवाल यांनी केले.
 
 


Swadeshi Sankalp Run 
स्वदेशी संकल्प दौड मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी प्रामुख्याने विदर्भ प्रांत संयोजक शिवाजी भालतिलक, स्वावलंबी भारत अभियान प्रांत संयोजक योगेश पोटोकार प्रा. विजयराव जोशी, विभाग संघचालक, चित्तरंजन राठी, जिल्हा संयोजक, अजय भारती, अजय कुळकर्णी सहसंयोजक, गजानन शिंदे, उपस्थित होते.
स्वदेशी संकल्प दौड Swadeshi Sankalp Run मॅरेथॉन स्पर्धा दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ६:३० वाजता अजिंठा रोड, बुलढाणा, कृषी तंत्र महाविद्यालय, परिसरात शेकडो च्या संख्येने उपस्थित युवा-युवती धावपड्ड स्पर्धकांच्या साक्षीने उत्साहात संपन्न झाली.स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक रोहित बिल्लार, द्वितीय करण चव्हाण, तृतीय अभय इंगळे, मुलीमध्ये प्रथम क्रमांक कु. प्रणाली शेगोकार, द्वितीय अंजली पंडीत, तृतीय कु. गौरी राठोड, पुरस्कारार्थ स्मीता गवई, प्रगती राऊत यांनी मान्यवरांच्या हस्ते रु.५१००रूपये, ३१००रूपये व २१०० रूपये या प्रमाणे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. या भव्य स्पर्धेचे परिक्षक क्रीडा प्रशिक्षक विजय वानखेडे आणि हर्षल काळवाघे यांनी केले. स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान आयोजित स्वदेशी संकल्प दौड मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री प्रा. विजय जोशी, शिवाजी भालतिलक, योगेश पोटोकार, प्रणव सावजी, अ‍ॅड. शरद राखोंडे, संदीप जाधव, अजय कुळकर्णी, नरेंद्र चोपडे, राजपुत, बुलढाणा शहरातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था बहुविध महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, आय.टी.आय. कॉलेज, महिला महाविद्यालय, पोलीस प्रशिक्षण संस्था, आदीती प्रत्यक्ष सक्रीय सहभाग घेतला. सदर स्पर्धेत ३२५ मुले, २२५ मुलींनी सहभाग नोंदविला. सामुहिक स्वदेशी शपथ घेवून वंदे मातरम, भारत माता की जय, ने कार्यक्रम समाप्त झाला.