शिव ठाकरेने दिली लग्नाची गुड न्यूज!

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Shiv Thackeray's wedding ‘बिग बॉस 16’च्या फर्स्ट रनरअप आणि मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अभिनेता शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी विषय आहे थेट त्याच्या लग्नाशी संबंधित. अभिनेता शिव ठाकरे मुंडावळ्या बांधत पारंपरिक वराच्या वेशात बोहल्यावर चढला असून, सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक सरप्राईज पोस्ट टाकली आहे. ‘Finally’ असा कॅप्शन देत त्याने फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या बाजूला त्याची बायकोही दिसते, मात्र तिचा चेहरा स्पष्ट नाही; ती पाठमोरी उभी आहे.
 
 
 

save 
फोटो पाहून स्पष्ट होते की दोघंही विवाहमंडपात आहेत. मागे नातेवाईक, लग्नाची सजावट आणि विधींचं वातावरण दिसत असल्याने अनेक चाहत्यांनी आणि नेटिझन्सनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. शिव ठाकरेने हा फोटो शेअर करताच अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या. भारती सिंहने “हे कधी झालं? अभिनंदन!” अशी प्रतिक्रिया दिली, तर विक्की जैन, आकांक्षा पुरी, ऐश्वर्या शर्मा, जेमी लिव्हर यांसह अनेक कलाकारांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
तरीही काही चाहत्यांनी या फोटोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी विचारले, “हे खरंच लग्न आहे की शूटिंगचा भाग?” तर काहींनी अंदाज वर्तवला, “हे एखाद्या प्रोजेक्टचं शूट असणार.” एप्रिल फूलच्या पार्श्वभूमीवरही काही युजर्सनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिव ठाकरेच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्सुकता दोन्हीचं वातावरण निर्माण झाले आहे, तर लग्नाबाबतची माहिती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.