"मला माफ करावे…” निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
जळगाव,
vishwajit-manohar-patil-resigns राज्यातील महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरदचंद्र पवार गटाचे युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीत, जिल्हा स्तरावरील एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याचा गट सोडल्यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
 
vishwajit-manohar-patil-resigns
 
विश्वजीत पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना अधिकृत राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, वैयक्तिक कारणांमुळे ते पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि युवक जिल्हाध्यक्ष पद सोडत आहेत. पत्रात पाटील यांनी नमूद केले आहे की, पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी ठेवून सन्मान दिला, तसेच नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमामुळे ते पक्षासाठी आजन्म ऋणी राहतील. राजीनामा फक्त वरिष्ठ नेत्यांकडे न पाठवता, पाटील यांनी फेसबुकवरही पोस्ट करून जाहीर केला. vishwajit-manohar-patil-resigns ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोस्टमध्ये त्यांनी भावनिक आवाहनही केले की, “पक्षाच्या कामात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा कोणाचे मन दुखावले असेल, तर मला माफ करावे.”
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाने तरुण नेत्यांकडे लक्ष देऊन पक्ष बांधणीवर भर दिला होता. विश्वजीत पाटील हे ग्रामीण भागातील सक्रिय चेहरा म्हणून ओळखले जात होते. निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी पद सोडल्यामुळे ग्रामीण भागातील पक्ष संघटनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार की राजकारणातून अल्प विश्राम घेणार, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा जोर धरल्या आहेत.