उत्तर प्रदेश,
wife murdered near police station उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील पाली पोलीस ठाण्याच्या परिसरात घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पहिल्या दिवशी पत्नी तिचा प्रियकरासोबत अनैतिक परिस्थितीत दिसली. दुसऱ्या दिवशी पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून नवऱ्याने थेट पोलीस ठाण्याजवळ बंदुकीने गोळीबार करत पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रामापूर अटारिया wife murdered near police station गावातील रहिवासी अनूप यांचे सोनीशी सुमारे १७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दांपत्याला संसारातून मुलेही आहेत. मात्र ७ जानेवारी रोजी सोनी पतीला सोडून तिचा प्रियकर सुरजीत याच्यासोबत घरातून पळून गेली होती. सुरजीत हा शहजहानपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर अनूपने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तपास करत wife murdered near police station महिलेला शोधून काढले आणि तिला पाली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. ही माहिती अनूपला समजताच तो गेल्या काही दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या आसपासच दबा धरून फिरत होता. आज सकाळी सोनी जेवणासाठी पोलीस ठाण्याच्या कॅन्टीनकडे जात असताना अनूपने अचानक तिच्यावर बंदुकीने धडाधड गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने सोनी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या, तेही पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील आणि सुरक्षित ठिकाणी गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी wife murdered near police station आणि फॉरेन्सिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. पोलिसांनी आरोपी अनूपला घटनास्थळीच बंदुकीसह अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत पत्नीच्या फसवणुकीमुळे आपण संतप्त झालो होतो आणि बदला घेण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.हरदोईचे पोलिस अधीक्षक अशोक कुमार मीणा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरात शस्त्रासह प्रवेश कसा झाला, याची सखोल चौकशी सुरू असून सुरक्षेत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर विभागीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.