घरकुल लाभार्थ्याचे प्रकरण...
बाभुळगाव,
तालुक्यातील गणोरी येथील 'Gharakul' case घरकुल प्रकरणी शेळ्या चारणाèया इसमाची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली. त्यांनी बाभुळगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उज्वला ढोले यांना पत्र देऊन एक आठवड्यात उचित कार्यवाही करावी व केलेल्या कामाचा अहवाल आपल्या कार्यालयाला सादर करावा, असे निर्देश दिले आहे.
या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली असून लांबलेला लाभार्थ्याच्या घरकुलाचा प्रश्न लवकरच निकाली निघेल अशी आशा पल्लवीत झाली आहे. सोबतच लाभार्थी शेख जाबीर यांना पंचायत समिती स्तरावर पाठपुरावा करावा, अडचण आल्यास आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे पत्र पालकमंत्री यांच्या कार्यालयातून देण्यात आले आहे. गणोरी येथील भूमिहीन शेख जाबीर शेख हुसेन (वय 45) हा शेळ्या चारुन आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत 27 जानेवारी 2025 च्या यादी प्रमाणे त्याचे घरकुल मंजूर झाले आहे. असे असतानाही त्याला पंसकडून घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला नाही. अनेक वेळा त्याने पंसकडे अर्ज विनंती केली. मात्र उपयोग झाला नाही.
शासनाकडून मिळणाऱ्या या पैशात 'Gharakul' case घरकुल पूर्ण होणार नाही. त्यामुळे त्याने शेळ्या विकून विटा आणल्या आहेत. घरकुलाच्या हप्त्यासाठी त्याने पंचायत समिती गाठली असता त्याला केवायसी केलेली नाही, असे सांगण्यात आले. त्याने लगेच केवायसी करून पंचायत समितीला माहिती दिली. मात्र सिस्टीममध्ये येण्यास चार-पाच दिवस लागतील असे त्याला पंचायत समितीच्या घरकुल विभागात सांगण्यात आले. यामुळे तो निश्चिंत झाला मात्र आजपर्यंत त्याच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालाच नाही.
'Gharakul' case यानंतर त्याने वारंवार याप्रकरणी पाठपुरावा करूनही त्याला यश आले नाही. अखेर सगळीकडून निराश झालेल्या शेख जाबीर शेख हुसेन याने मृद संधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व उपजिल्हाधिकारी तथा विशेष कार्यकारी अधिकारी मोहन जोशी यांच्याकडे तक्रार दिली. पालकमंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणी गटविकास अधिकारी बाभुळगाव यांना पत्र देऊन एका आठवड्यात उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अर्जदार शेखजाबीर शेखहुसेन यांना एक पत्र देऊन पंचायत समितीत पाठपुरावा करावा व अडचण आल्यास आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे पत्र दिले आहे.