२१ वर्षीय एअर होस्टेसची आत्महत्या

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
कल्याण,
Air hostess commits suicide कल्याणपूर्व मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय एअर होस्टेस नेहा पावशे हिने प्रेमसंबंधातून झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नेहाच्या मोबाईल तपासणीत कौशिक पावशे या तरुणाने तिला धमकावले आणि फसवले असल्याचे संदेश सापडले. या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी कौशिक पावशे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून त्याला लवकरच अटक होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, आरोपी अद्याप मोकाट असल्याने संतप्त कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यावर घेराव घालून गोंधळ केला.
 
 
Air hostess commits suicide
 
कुटुंबीयांच्या मते, कौशिकने नेहाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे वचन दिले, पण प्रत्यक्षात ती आर्थिक फसवणूक, मारहाण आणि मानसिक छळ सहन करत होती. तसेच, आरोपीने नेहाचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने पैसे मागितले. पोलिसांच्या माहितीनुसार, नेहा आणि कौशिक यांचे प्रेमसंबंध २०२० पासून सुरू होते. आरोपीने नेहासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि वेळोवेळी मारहाण करून तिला त्रास दिला. तसेच, हैदराबादमध्ये बदली झालेल्या नेहावर आरोपीने तिथे जाऊनही मारहाण केल्याचे पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणामुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीय आणि महिलांनी आरोपीवर कठोर कारवाई होण्याची मागणी केली आहे.