मोर्शीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उपाध्यक्ष

डॉ. प्रदीप कुर्‍हाडे यांची अविरोध निवड

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
मोर्शी, 
morshi-nationalist-sharad-pawar-party : मोर्शी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी नगराध्यक्ष व नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा नगरपालिकेच्या सभागृहात मंगळवार, १३ जानेवारीला पार पडली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे डॉ. प्रदीप कुर्‍हाडे यांची अविरोध निवड झाली आहे.
 

J 
 
स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसच्या सय्यद रियाज सय्यद हमजा तर भाजपाच्या वतीने जयंत ढोले, ज्योतीप्रसाद मालवीय व सरिता सचिन उमाळे यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी भाजपाच्या गटनेता प्रीती देशमुख यांनी सुचविल्या प्रमाणे सरिता उमाळे या स्वीकृत नगरसेवकपदी रितसर निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे वतीने स्वीकृत सदस्यपदासाठी सतीश डफळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नामांकन अर्ज छाननी दरम्यान अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे ती जागा रिक्त असल्याचे घोषित करण्यात आले. निवडणुकीचा कार्यक्रम नगराध्यक्ष प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने, प्रभारी मुख्याधिकारी शिवदास मुसळे, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अमोल ढोले यांच्या उपस्थितीत पार पडला.
 
 
 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नगरसेविका सबिया अर्शी शेख इरफान, विद्या ढवळे, कांचन भोजने, निलेश महल्ले, आनंद सदातपुरे, काँग्रेस पक्षाचे सागर ठाकरे, राखी गौरव खेरडे, भूषण कोकाटे, रवी परतेती, कमरुनिसा शेख शब्बीर,
भाजपाचे हर्षल चौधरी, नितीन पन्नासे, सुनीता कोहळे, प्रीती ब्रह्मानंद देशमुख, जयश्री आगरकर, मोनाली फंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अंकुश घारड, प्रीती नाना देशमुख, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक अमन गायकी, रवींद्र गुल्हाने, अपक्ष नगरसेविका दिपाली बडोदेकर, नईमखान रहेमतुल्ला खान, प्रभा फंदे उपस्थित होते. नर्वनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुर्‍हाडे, स्वीकृत सदस्य यांचा नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नगरपालिका कार्यालयासमोर ढोल ताशे वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.