‘Are You Dead?’ चीनमध्ये सर्वाधिक डाउनलोड झालेले अ‍ॅप

दर दोन दिवसांनी विचारते – तुम्ही जिवंत आहात ना?

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
बीजिंग,  
are-you-dead-app-in-china “आपल्या सावलीला पाहूनही घाबरतो; आयुष्य इतकं एकटे गेले” गुलजारचा हा प्रसिद्ध शेर आजच्या काळातील माणसांवर अगदी तंतोतंत लागू होतो. चीनमधून आलेल्या एका बातमीने हे सिद्ध केले आहे की, आजचा माणूस किती एकटा झाला आहे. प्रत्यक्षात, चीनमध्ये अलीकडेच एक अ‍ॅप खूप वेगाने लोकप्रिय होत आहे, ज्याचे एकमेव काम फक्त हे तपासणं आहे की तुम्ही जिवंत आहात की नाही. या अ‍ॅपची क्रेज इतकी वाढली आहे की, ते चीनमधील सर्वाधिक डाउनलोड होणारे पेड अ‍ॅप बनले आहे.

are-you-dead-app-in-china 
 
‘Are You Dead?’ सं या अ‍ॅपचे नाव असून, चीनमध्ये हे सर्वाधिक डाउनलोड होणारे पेड अ‍ॅप ठरले आहे. या अ‍ॅपची संकल्पना अतिशय साधी पण तितकीच धक्कादायक आहे. वापरकर्त्याने दर दोन दिवसांत अ‍ॅपवरील एका मोठ्या बटणावर क्लिक करून “मी जिवंत आहे” अशी नोंद करायची असते. जर दोन दिवसांत ही नोंद झाली नाही, तर अ‍ॅप आपोआप वापरकर्त्याने दिलेल्या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर (आई-वडील, जोडीदार, मित्र किंवा जवळचा नातेवाईक) संदेश पाठवतो आणि संबंधित व्यक्ती अडचणीत असण्याची शक्यता असल्याची सूचना देतो. are-you-dead-app-in-china विशेष म्हणजे, मागील वर्षी मे महिन्यात हे अ‍ॅप लॉन्च झाले तेव्हा त्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नव्हते. मात्र गेल्या काही आठवड्यांत चीनमधील मोठ्या शहरांत एकटे राहणारे तरुण, नोकरदार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हे अ‍ॅप डाउनलोड करू लागले आहेत. त्यामुळे अल्पावधीतच हे अ‍ॅप चीनमधील सर्वाधिक डाउनलोड होणारे पेड अ‍ॅप बनले आहे.
चीनच्या सरकारी माध्यम  अहवालानुसार, 2030 पर्यंत चीनमध्ये सुमारे 20 कोटी लोक एकटे राहणारे असतील. अशा लोकांनाच लक्षात घेऊन हे अ‍ॅप तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. are-you-dead-app-in-china एकटे राहणारे कर्मचारी, घरापासून दूर शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी किंवा स्वेच्छेने एकाकी आयुष्य स्वीकारलेले लोक – या सर्वांसाठी हे अ‍ॅप एक प्रकारचा आधार ठरत आहे. अडचणीच्या क्षणी कुणाला तरी सूचना मिळावी, यासाठी हे अ‍ॅप उपयोगी ठरत आहे. अहवालानुसार, चीनी सोशल मीडियावर एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर एकटे राहणाऱ्या लोकांसाठी अशा प्रकारच्या सुविधेची गरज असते. विशेषतः अंतर्मुख व्यक्ती, नैराश्यात असलेले लोक, बेरोजगार किंवा असुरक्षित परिस्थितीत जगणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे आहे.” चीनमध्ये लोकप्रिय होत असलेले हे अ‍ॅप केवळ तंत्रज्ञानाचे उदाहरण नाही, तर आधुनिक समाजातील वाढता एकटेपणा आणि माणसांमधील तुटलेली नाती यांचे विदारक वास्तवही अधोरेखित करत आहे.