हेल्मेट घालून मुख्यमंत्र्यांचा रोड शो
स्वतः बुलेट चालवून केला प्रचार
नागपूर,
cm devendra fadnavis विरोधकांनी केवळ करण्याचे कार्य केले आहे. विरोधक विकास करूच शकत नाहीत. त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीलाच नागपूरकर कौल देतील. नागपूर महापालिका तसेच मुंबई मनपावर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो नंतर महाल येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात नागपूर चौफेर विकास झाला आहे. त्यामुळे मनपाच्या निवडणूकीत मागचा विक्रम मोडणार असून नागपूरसह राज्यात सर्वत्र आपला विजय होणार आहे. सर्वसामान्य लोकांसाठी सोयीसुविधा देण्यासाठी राज्यात विकासाची अनेक कामे झाली असल्याने महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केले. नागपूर महापालिका निवडणुकीचा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बुलेटवर होत मध्य नागपुरातील भारत माता चौक येथून रोड शो केला. भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भारत माता चौक ात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी रोड शो करिता स्वतः हेल्मेट घालून बुलेट रॅलीत सहभाग घेतला.
रोड शो दरम्यान ठीक ठिकाणी स्वागत
भारत माता चौकात मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट घातल्यानंतर स्वतः बुलेट उमेदवारांचा प्रचार केला. कडक पोलिस बंदोबस्तात ठीक ठिकाणी या रोड शो दरम्यान गुलाब फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. तीन नल चौक, शहीद चौक, इतवारी चितार ओळ, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल मार्गे गांधी गेट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या रोडशोचा समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रविण दटके, आमदार आशिष देशमुख, आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार गिरीश व्यास, संजय भेंडे व भाजपाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी रॅली काढल्या होत्या. प्रचार उमेदवार आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.
फुगे, भाजपचे झेंडे, भगव्या पताका, स्वागतद्वार
मुख्यमंत्र्यांच्या रोड शोच्या मार्गावर ठिकठिकाणी फुगे, भाजपचे झेंडे, भगव्या पताका, तोरण, स्वागतद्वार उभारून,गुलाब पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. भारत माता चौक येथून रोड शो सुरुवात झाल्यानंतर सर्वच ठिकाणी भव्य स्वागत झाले.cm devendra fadnavis भाजपाचे पदाधिकारी व सर्वसामान्य सुध्दा पुष्पहार घालून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. याशिवाय विविध सामाजिक संघटनेतर्फे या रोड शो चे पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.
रॅलीव्दारे शक्तीप्रदर्शन
नागपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस म्हणजे शक्तीप्रदर्शनाचा उत्सवच असल्याने मंगळवारी शहरातील सर्वच प्रभागात दुचाकी वाहनांची गर्दी दिसून आली. सत्ताधारी व विरोधी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी सुध्दा दुचाकी चारचाकी वाहनांसह काढून शक्तीप्रदर्शन केले.
निवडणुकीच्या प्रचारात आमदार, खासदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रचार सभा घेत मतदारांचे लक्ष वेधले आहे. रविवारच्या प्रचार रॅलीनंतर मंगळवारी सायंकाळपर्यंत अनेक उमेदवारांनी दुचाकी चालवत रॅली काढली.