धामणगाव रेल्वे भाजपाचा उपाध्यक्ष अविरोध

स्वीकृत सदस्य व गटनेत्याची घोषणा

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
धामणगाव रेल्वे, 
dhamangaon-railway-bjp : मंगळवारी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड - रोठे यांच्या आणि मुख्याधिकारी पूनम कळंबे यांच्या उपस्थितीत धामणगाव रेल्वे नगरपालिका उपाध्यक्षपदी गिरीश (बंडू) मुंधडा यांची निर्विरोध निवड करण्यात झाली. सोबतच स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. असित श्यामसुंदर पसारी व अ‍ॅड. रीना मनोज व्यास यांची सुद्धा अविरोध निवड करण्यात आली
 

BJP 
 
//गटनेतेपदी नरेंद्र चौधरी
 
 
धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण वर्चस्व असून २० पैकी २० नगरसेवक आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. विरोधी पक्ष म्हणून नगरपालिकेत नाहीच तर गटनेते म्हणून नगरसेवक नरेंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या राजकारणात वर्ष २०२५ च्या निवडणुका ऐतिहासिक ठरल्यात. डॉ. अर्चना अडसड - रोठे यांनी नगराध्यक्षपदाची अधिकृत सूत्रे हाती घेतली.
 
 
मंगळवारी झालेल्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या औपचारिक निवड प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. हेमकरण कांकरीया, गोपाल द्विवेदी, रवि कुकरेजा, मुरलीधर पतके, दर्शन राठी, जगदीश राय, विलास बूटले, अंशुल श्यामलाल बड़गैया, मंजिरी भोगे, प्रतिभा खोब्रागडे, मनिषा शिरभाते, रीना साहू, रंजना शेलोकार, सीमा बागडे, प्रियंका जवंजाळ, काजल उपरीकर, सीमा पेंदाम, अंजली मार्वे उपस्थित होते. नवनिर्वाचित उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य आणि गटनेता यांचे स्वागत करण्यात आले.