मतदारांनी तयार व्हा! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक फेब्रुवारीत
दिनांक :13-Jan-2026
Total Views |
मुंबई,
district-council-panchayat-samiti-election राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याची तारीख 16 जानेवारीपासून 21 जानेवारीपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी केली जाईल. मतदान 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होईल, तर मतमोजणी 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होऊन निकाल जाहीर केला जाईल.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये 50% पेक्षा कमी आरक्षण असलेल्या जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. district-council-panchayat-samiti-election राज्यात एकूण 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत – एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरे मत पंचायत समितीसाठी. district-council-panchayat-samiti-election अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे आणि नामनिर्देशन महापालिकेसारखीच पार पडेल. आरक्षित जागांसाठी जातवैधता प्रमाणपत्राची पडताळणी आवश्यक असेल.