प्रत्येक विद्यार्थिनी स्वयंसिद्धा व्हावी

– डॉ. प्रशांत नारनवरे यांचे प्रतिपादन

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
नागपूर,
dr prashant narnavare प्रत्येक विद्यार्थिनीने स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनावे, असे प्रतिपादन राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित ‘स्वयंसिद्धा’ कार्यशाळेत ते प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी ही कार्यशाळा पार पडली.
 

नारनवरे  
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर होत्या. यावेळी वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल आणि विद्यापीठ स्वयंसिद्धा अभियान समन्वयक डॉ. शालिनी लिहितकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नारनवरे यांनी शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेसाठी विद्यार्थिनींनी स्त्री-शक्ती पोर्टलवरील ‘स्वयंसिद्धा’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे विविध महाविद्यालयांतील विद्यार्थिनींचे मजबूत नेटवर्क निर्माण होऊन शैक्षणिक प्रगतीसह कलागुण विकासाची संधी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी महिलांनी मानसिकदृष्ट्या कणखर होऊन स्वतः सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थिनींची स्वयंसिद्धा पोर्टलवर नोंदणी करून विविध उपक्रम स्त्री-शक्ती पोर्टलवर अपलोड करावेत, असे त्यांनी सुचविले. प्रास्ताविकात डॉ. शालिनी लिहितकर यांनी स्वयंसिद्धा उपक्रमाच्या उद्दिष्टांची माहिती दिली.dr prashant narnavare कार्यक्रमात विद्यापीठ व जिल्हा पातळीवरील स्वयंसिद्धा समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.