नायलॉन मांजा शेतात, मजुरांच्या जीवितास धोका

* नायलॉन मांजाचा ऑनलाईन कहर, कारवाईची मागणी

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
nylon-kite-string : नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. पण, त्यानंतरही नायलॉन मांजा निदर्शनास येतो. जिल्ह्यात अनेकांवर नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी पतंगांना दिसणारा नायलॉन मांजा ऑनलाईन बोलाविण्यात येत असल्याची शयता वर्तविण्यात येत आहे. त्यातच नायलॉन मांजा असलेल्या तुटलेल्या पतंग शेतशिवारात उडत येत असल्याने शेतात काम करणार्‍यांसोबत पक्षी, जनावरांनाही धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
 
 
 
JK
 
 
 
मकरसंक्रांतीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा करण्यात येतो. शहरासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येतात. रंगबेरंगी पतंगांनी आकाश व्यापलेले दिसते. पतंग उडविताना पतंग काटण्याची स्पर्धा लागलेली पाहायला मिळते. पतंगांकरिता अनेक जण साध्या धाग्याचा वापर करतात. तर अलीकडे अनेक जण मांजा तसेच नायलॉन मांजाचा देखील वापर करताना आढळतात. नायलॉन मांजावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. असे असले तरी अनेक ठिकाणी नायलॉन मांजा आढळून येतो. पतंगांना नायलॉन मांजा आढळून येतो. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे. चोरून लपून मांजा विक्री करणार्‍यांवर कारवाईदेखील करण्यात येते. पण, त्यानंतरही अनेक ठिकाणी पतंगांना नायलॉन मांजा आढळून येतो.
 
 
नायलॉन मांजामुळे दुर्घटना होण्याची शयता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी ऑनलाईन नायलॉन मांजा बोलाविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मनुष्यासोबतच पशु पक्ष्यांकरिता हा मांजा घातक ठरतो. अनेकांना यामुळे दुखापत झाली आहे. नायलॉन मांजा अनेकांच्या जीवावर बेतला आहे. असे असताना अनेक जण ऑनलाईन पद्धतीने हा मांजा बोलावत असल्याचे सांगण्यात येते. तसेच लपून देखील या मांजाची विक्री होण्याची शयता नाकारता येत नाही. ग्रामीण भागात अनेकांची शेती गावालगत असते. अनेक पतंग तुटून लगतच्या शेतशिवारात जातात. पतंगांना मांजा लागलेला असतो. हा मांजा शेतात काम करणार्‍यांसोबतच पशु पक्ष्यांना दुखापत करण्यास कारणीभूत ठरू शकतो. याकडे लक्ष देत नायलॉन मांजाच्या अनुषंगाने कारवाईची मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
 
 
अपघाताची भीती
 
 
तुटलेली पतंग पकडण्यासाठी अनेक चिमुकले पतंगांच्या मागे धावताना दिसतात. रस्त्यांवर मोठ्या संख्येने वाहने धावतात. अनेकदा खड्डेही रस्त्यांवर असतात. अशा स्थितीत दुर्घटनेची शयता नाकारता येत नाही. त्यामुळे या अनुषंगाने काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.