सिंदीरेल्वे,
sheikh-aqeel : नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी आज भाजपाच्या शेख अकील यांची १२ विरुध्द ९ अशी बहुमताने निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून भाजपाच्या शहराध्यक्ष अजया साखळे व काँग्रेस आणि श. प. गटातर्फे राकाँचे गंगाधर कलोडे यांची निवड करण्यात आली.
नगराध्यक्ष राणी कलोडे तसेच मुख्याधिकारी पौर्णिमा गावित यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. स्थानिक पालिकेच्या निवडणुकीत २० नगरसेवक आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आलेत. त्यात भाजपाचे दहा नगरसेवक आणि अपक्ष ममता बोंगाडे यांनी भाजपाची कास धरल्यामुळे भाजपाचे अकरा नगरसेवक झालेत. काँग्रेसचे चार आणि शरद पवार गटाचे ५ नगरसेवक विजयी झाले होते. या दोन्ही काँग्रेस मिळून संख्याबळ नऊ होते. त्यामुळे आज स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपाच्या अजया साखळे व गंगाधर कलोडे यांचे अर्ज आले होते. नवनिर्वाचित सर्व पदाधिकार्यांचे शहरातील विविध संस्था, संघटना तसेच पत्रकारांनी अभिनंदन केले.