‘ग्रो-कॅपिटल’मध्येही ‘बंटी-बबली’ पॅटर्न

-दिग्रसवरुन ‘ग्रो-कॅपिटल’ कंपनीच्या खात्यात मोठे व्यवहार -पोलिसांचा तपास आर्थिक व्यवहारावर केंद्रित -40 तक्रारकर्त्यांचा 7 कोटी 43 लाख रुपयांचा आकडा

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
grow capital ‘ग्रो-कॅपिटल’ कंपनीमध्येही बंटी-बबली ‘पॅटर्न’ निघाल्याने दररोज या कंपनीविरुद्ध तक्रारीची शृंखला वाढत आहे. आतापर्यंत 40 तक्रारीतील रकमेचा आकडा 7 कोटी 43 लाखांवर पोहोचला आहे. नेमके कंपनीच्या खात्यात किती कोटींचे व्यवहार झाले, यावर पोलिस तपास करीत आहेत.
 
 

fraud 
 
 
मनोज अशोक पाटील, पुष्पांजली दिनेश रंधेरिया (दोघेही रा. वर्धा) या ‘बंटी-बबली’ने दिग्रस येथील गिरीश दुधे, विनोद दुधे, अपर्णा दुधे या तिघांच्या मदतीने नागरिकांना चुना लावला. फसवणूक झालेल्यांमध्ये शिक्षक, केंद्रप्रमुख आणि कर्मचाèयांचा समावेश आहे. जादा परतावा मिळणार या आमिषापोटी शिक्षक व कर्मचाèयांनी लाखोंची गुंतवणूक केली. 30 लाख, 50 लाख अशा गुंतवणुकीच्या रकमा असल्याचे सांगितले जाते.
तपासाच्या अनुषंगाने दिग्रस पोलिसांचे पथक वर्धेत गेले होते. फसवणुकीच्या गुन्ह्यात पाचजणांचा सहभाग समोर आला असला तरी यात मोठी साखळी गुंतलेली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस तपासात ग्रो-कॅपिटल व विश्वांजली व्हेचर एलएलपी कंपनीच्या खात्यात मोठे व्यवहार झाल्याचे समोर येत आहे.grow capital पोलिसांनी आर्थिक व्यवहारावर आपला तपास केंद्रित केला आहे. पोलिसांनी वर्धेतून माहिती काढली असता यामधील दोन्ही आरोपी दोन महिन्यांपूर्वीच दुबईला पसार झाल्याची माहिती मिळाली. येथील गिरीश दुधे व विनोद दुधे या दोघांच्या पोलिस कोठडीत 13 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.
 

फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असून, पथक वर्ध्याला पाठवले होते. मुख्य दोन आरोपी दोन महिन्यांपूर्वीच दुबईला पसार झाल्याची माहिती मिळाली. तक्रारीचा आकडा 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
- वैजनाथ मुंडे,
ठाणेदार, दिग्रस