भारताला आता जर्मनीच्या ट्रान्झिट व्हिसाची आवश्यक नाही

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
transit visa for Germany भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्झ यांनी घेतलेल्या बैठकीत संरक्षण, व्यापार तसेच महत्त्वाच्या खनिजे आणि अर्धवाहक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. बैठकीनंतर दोन्ही देशांमधील एकोणीस करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
 
 
 
transit visa for Germany india
या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमध्ये भारतीय प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल देखील करण्यात आला आहे. आता जर्मनीतून दुसऱ्या देशात प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता राहणार नाही. पूर्वी जर्मन विमानतळावर फ्लाइट बदलण्यासाठी भारतीय नागरिकांकडे ट्रान्झिट व्हिसा असणे अनिवार्य होते. मात्र, जर्मनीच्या या नवीन निर्णयामुळे भारतीय नागरिक आता थेट जर्मनीतून दुसऱ्या देशात प्रवास करू शकतील, ज्यामुळे प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षीत होईल. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी राजकीय आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जात, भारत-जर्मनी संबंध दृढ करण्याचे महत्त्वाचे वचन दिले आहे. या बदलामुळे व्यावसायिक तसेच पर्यटनासाठी जर्मनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.