वाहतूक नियमांचे पालन करणार्‍यांचा ‘गुलाबपुष्प’ देऊन सन्मान

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
जिल्हा वाहतूक शाखा, नायरा एनर्जीचा उपक्रम
गोंदिया :
रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि Awareness among drivers वाहन चालकांमध्ये जागृति व त्यांना शिस्त लागावी यासाठी केवळ दंड आकारणे हा हेतू न राखता, नियमांचे पालन करणार्‍यांना प्रोत्साहित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हाच आदर्श बाळगून बुधवार 14 जानेवारी रोजीसकाळी 11 वाजता शहरातील गायत्री मंदिर चौक, कुडवा येथे जिल्हा वाहतूक शाखा आणि नायरा एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
 
 
vahatukk
 
Awareness among drivers  यावेळी वाहतूक नियमांचे पालन करणार्‍या, हेल्मेट परिधान करणार्‍या आणि सीटबेल्ट लावणार्‍या वाहन चालकांना थांबवून त्यांचे गुलागपुष्प देऊन स्वागत करण्यात आला. दरम्यान कर्तव्यावरील वाहतुक पोलिसांनी अचानक थांबवल्यामुळे अनेक वाहनचालक गोंधळले, मात्र कौतुक होत असल्याचे समजताच त्यांच्या चेहर्‍यावर समाधान व आनंद झळताना दिसला. रस्ते सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही तर ती प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. नियमांचे पालन करणार्‍यांचा सन्मान केल्यामुळे इतर नागरिकांनाही शिस्त पाळण्याची प्रेरणा मिळेल. हाच हेतू बाळगून नायरा एनर्जीच्या सहकार्याने जिल्हा वाहतुक शाखेने उपक्रम राबविला.यावेळी जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक नागेश भास्कर, नायरा एनर्जीचे व्यवास्थापक यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी, पोलिस अंमलदार, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

अपघात टाळण्यासाठी वेगमर्यादेचे पालन, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, वाहतूक सिग्नलचे पालन करावे, वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, विमा आणि पीयुसी ही कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी. वाहतुकीचे नियम पाळणे हे केवळ कायदेशीर बंधन नाही तर ते आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
 
- नागेश भास्कर
पोलिस निरिक्षक, जिल्हा वाहतुक शाखा, गोंदिया