चीनने नखे काढलीच

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
 
 
अग्रलेख...
 
 
china shaksgam valley व्याप्त काश्मिरच्या मुद्यावर चीनने पुन्हा एकदा भारताची चिंता वाढविणारी भूमिका घेतली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भविष्यात दोन्ही देशांमध्ये शक्सगम खोऱ्यावरून लष्करी तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शक्सगम खोरे व्याप्त काश्मिरातील गिलगिट-हुंझाचा भाग आहे. नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत मनोहारी असलेला हा भाग लष्करी आणि रणनितिकदृष्ट्याही महत्वाचा आहे. स्वातंत्र्यानंतर गिलगिट एजन्सीचा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात होता. येथे कार्यरत इंग्रज लष्करी अधिकारी ....फितूर झाला आणि त्याने जम्मू-काश्मीर संस्थानचा हा अत्यंत मोक्यावरील हा प्रदेश पाकिस्तानात विलीन केल्याचे घोषित केले. 1947-48 पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मघाती धोरणांमुळे गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश शत्रूच्या ताब्यात गेला. स्कार्दू या ठिकाणी काश्मीर संस्थानचे सैनिक तैनात होते पण हिवाळा असल्याने भारतीय सैनिक त्यांना मदत पोहचू शकले नाहीत. परिणामी कारगीलपासून जवळ असलेले हे शहर पाकिस्तानच्या ताब्यात गेले. येथे हवाईतळ उभारण्यात आला. किंबहुना येथे चीनची लढाऊ विमाने तैनात आहेत.
 
 
 
शक्सगम खोऱ्या
 
 
पाकिस्तान आणि चीन यांच्यात सीमारेषा नव्हती. 2 मार्च 1963 रोजी दोन्ही देशांमध्ये एक सीमा करार झाला जो पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशीर आहे. चीनमधील पेकिंग शहरात पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री झुल्फीकार अली भुट्टो आणि चीनचे परराष्ट्रमंत्री मार्शल चेन यी यांनी 2 करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार काश्मीरच्या उत्तेरकडील 5200 वर्ग किलोमीटर एवढा भूभाग चीनला परस्पर देऊन टाकला. याच भागातून चायना-पाकिस्तान इकानामिक कॅरिडोर(सीपेक) हा प्रकल्प गेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात चीनकडून महामार्ग, रेल्वे मार्ग उभारण्यात आले आहेत. एक महामार्ग तर थेट बलुचिस्तानच्या ग्वादार बंदरापर्यंत पोहचला आहे. सीपेक मुद्यावर बोलताना 9 जानेवारीला साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर सावरकर यांनी 1963 च्या चीन-पाकिस्तान सीमा करार अवैध असून भारत या कराराला मानत नसल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर सीपेक बेकायदेशीर
असून भारतीय भूभागात प्रकल्प उभारणे कोणत्याही स्थितीत मान्य नाही. शक्सगम खोरे आमच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार भारताला आहे, असे सावरकर यांनी कडक शब्दात सांगितले. या शक्मगम खोऱ्यावर चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी हा भाग आमचाच असून पाकिस्तान आणि चीन या दोन सार्वभौम देशांमध्ये झालेल्या सीमा करारानुसार आमच्या भूभागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
भूतकाळात केलेल्या चुकांचे भावी पिढ्यांना परिणाम भोगावे लागतात याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे जम्मू-काश्मीर होय. काश्मीरचे संस्थानिक राजा हरिसिंग यांनी संपूर्ण जम्मू-काश्मीर भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला. अशावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारने देशहित लक्षात घेऊन त्वरित संपूर्ण जम्मू-काश्मीर लष्कर पाठवून ताब्यात घेण्याची आवश्यकता होती. पण, दुर्देवाने कालापव्यय करीत त्यांनी
पाकिस्तानला घुसखोर काश्मिरात पाठविण्याची संधी दिली. भारताकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ऐन हिवाळ्यात पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान आणि काश्मीर खोऱ्यात हजारो घुसखोर आणि सोबत सैनिक घुसविले. महाराजा हरिसिंग यांनी विलिनीकरण दस्तवेजावर स्वाक्षरी केल्यानंतर नेहरू यांनी लष्करी हालचाली सुरू केल्या. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण, तोपर्यंत लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान या भूभागावर पाकिस्तानने अवैधरित्या ताबा मिळविला होता. या प्रदेशाला चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या सीमा भिडतात. या भूभागातून भारताला थेट युरोपीयन देशांसोबत व्यापार करता आला असता. पण, भविष्याचा थोडाही विचार न करता तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीर मुद्यावर बोटचेपे धोरण स्वीकारले.china shaksgam valley याचे गंभीर परिणाम आज आपण भोगत आहोत. उलट चीनने भविष्याचा विचार करताना तिबेट तर बळकावलाच पण 1962 मध्ये लडाखमधील अक्साई चीन हा मोठा भूभागही गिळंकृत केला. हिंदी-चिनी भाई भाईच्या
घोषणांमध्ये नेहरू आणि त्यांचे पाठीराखे मश्गूल असताना तिकडे चीन काराकोरम महामार्ग उभारण्यासाठी तळमळत होता. 1961मध्ये संसदेत अक्साई चीनवर चर्चा सुरू होती. चीनच्या आक्रमक हालचालींमुळे संसद सदस्य चिंता व्यक्त करीत होते. मात्र, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना काश्मीरचे काहीच घेणेदेणे नव्हते, हे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले. अक्साई चीन, जिथे गवताचे एक पातेही उगवत नाही आणि 17 हजार फूट उंचीवरील हे बर्फाळ ठिकाण मानवासाठी राहण्यास योग्य नाही. तसेच हा भाग कुठे आहे हेही आपल्याला माहित नाही. नेहरूंच्या या विधानावर खासदारांनी आश्चर्य व्यक्त केले. देशाचा पंतप्रधान असे विधान कसे काय करू शकतो, असे भाव खासदारांच्या चेहèयावर होते. मात्र, माजी सैनिक असलेले खासदार महावीर त्यागी हे उभे राहिले आणि व्यंग करीत म्हणाले, माझ्या डोक्यावरही एकही केस उगवत नाही. याचा अर्थ माझे डोके बेकार आहे काय? त्यागी यांच्या या वाक्यावर सर्व खासदार एका क्षणासाठी अवाक् झाले पण दुसऱ्याच क्षणी सभागृहात हास्याचे फवारे उडाले. पण, दुसèयाच वर्षी चीनने 1962 मध्ये चीनने आक्रमण करीत
अक्साई चीनसह लडाखचा बराच भूभाग ताब्यात घेतला. चीनबाबत पंडित नेहरू यांची भूमिका किती तकलादू आणि आत्मघातकी ठरणारी होती हे सिद्ध झाले. चीनने अक्साई चीन घेऊन आज 64 वर्षे उलटली आहेत. भारत आजही अक्साई चीन आपला भूभाग मानत असला तरी या भागावरील चीनची मगरमिठी अधीकच घट्ट झाली आहे. यावर कडी म्हणजे चीनने आता शक्सगम खोऱ्यावरही दावा सांगितला. या खोऱ्यातून सीपिके-2 अंतर्गत चीनने पाकिस्तानला जोडणारा एक महामार्ग उभारला आहे. चीनचे हे कृत्य चिथावणी देणारे तर आहेच पण आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे उल्लंघनही आहे. महामार्ग उभारणीला भारताने विरोध करीत शक्सगम खोरे आमचा अविभाज्य घटक असून चीनचे कृत्य बेकायदेशीर असल्याची भूमिका भारताने मांडली. यावर तिळपापड झालेल्या चीनने चोर ते चोर अन् वरून शिरजोर, या उक्तीप्रमाणे हे खोरे आमचेच असल्याचे विधान केले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चीनबाबतचे धोरण किती चुकीचे आणि आत्मघातकी होते हे आता सिद्ध होत आहे. नेहरूंना दोष देण्यात काय अर्थ
आणि आणखी किती काळ नेहरूंना जबाबदार धरणार, असे आजचे काँग्रेसचे नेते म्हणत असले तरी, पश्चिम आणि पूर्वोत्तर सीमेवर नेहरूंच्याच चुकांमुळे भारताला एकाचवेळी दोन शत्रूंचा सामना करावा लागत आहे, हे विसरता येणार नाही. चीन आणि पाकिस्तान सातत्याने भारताला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. एकीकडे सीमेपलीकडून दहशतवादी पाठवून भारताला जखमी करण्याचे काम पाकिस्तान सातत्याने करीत असतो तर दुसरीकडे चीन डोकलाम, गलवान सारख्या कुरापती करीत दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असतो. व्यापार कराराच्या मुद्यावर आधीच अमेरिकेसोबत तणाव असताना चीनने शक्सगम खोऱ्याचा मुद्दा उपस्थित करीत भारताच्या चिंता वाढविल्या आहेत. पूर्वेकडे बांगलादेशही भारताच्या मुळावर उठला आहे. ज्या देशाला आपण जन्माला घातले तोच आता आपल्याला वाकुल्या दाखवित आहे. त्यामुळे भारताला एकाचवेळी पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश या त्रिकुटाशी सामना करावा लागत आहे. बांगलादेशला ढेकणासारखे चिरडण्यास भारताला थोडाही वेळ लागणार नसला तरी पाकिस्तान-चीन यांचे एकत्रित
आव्हान चिंतेत टाकणारे आहे. कारण, शक्सगम खोèयाचा संबंध या दोन्ही देशांशी आहे. पण, आज ना उद्या भारताला या आव्हानाचा सामना करावाच लागणार हे मात्र, नक्की.