दक्षिण अमेरिकेच्या लहान देशाकडून भारताला मोठी मदत; तेल संकटातून सुटका!

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
क्विटो,  
ecuador-help-to-india गेल्या काही काळापासून भारताने रशियन तेलाची खरेदी घटवली आहे. यामुळे भारत आता विविध पर्यायांकडे लक्ष देत आहे आणि एकाच देशावर अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरातील तणावामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत, तसेच रशियन तेलाचा पुरवठा कमी झाल्यामुळे भारताने आपला पर्याय शोधला आहे.
 
ecuador-help-to-india
 
रॉयटर्सच्या माहितीनुसार, भारताने इक्वेडोर या दक्षिण अमेरिकेतील लहान देशाकडून तेल खरेदी केले आहे. भारतीय सरकारी कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने सुमारे 20 लाख बॅरल कच्चे तेल इक्वेडोरकडून खरेदी केले आहे. भविष्यात आणखी तेल खरेदी होऊ शकते, ज्यामुळे रशियन तेलाच्या तुटीची भरपाई करता येईल. आयओसी रशियन तेलावर अमेरिका आणि युरोपियन युनियनने लादलेले निर्बंध लक्षात घेऊन इतर देशांकडून तेल खरेदी करत आहे. इक्वेडोरसह मेक्सिको, ब्राझील आणि कोलंबिया यांच्याकडूनही भारताने तेल विकत घेण्याचे पाऊल उचलले आहे. ecuador-help-to-india आयओसीने अद्याप या खरेदीच्या किंमतीसंबंधी अधिकृत माहिती दिलेली नाही.
इक्वेडोर हे महाराष्ट्रापेक्षा लहान देश आहे. इक्वेडोरचे क्षेत्रफळ सुमारे 2,83,561 चौ.किमी. असून, महाराष्ट्राचे 3,08,000 चौ.किमी. आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रात सुमारे 14 कोटी लोक राहतात, तर इक्वेडोरमध्ये सुमारे 1.8 कोटी लोकसंख्या आहे. आर्थिक दृष्ट्या, इक्वेडोरचा एकूण जीडीपी 130.5 अब्ज डॉलर्स आहे, तर महाराष्ट्राचा अंदाजे 580 अब्ज डॉलर्स. यावरून दिसून येते की जीडीपीच्या बाबतीत महाराष्ट्र इक्वेडोरपेक्षा सुमारे 4.5 पट मोठा आहे. ecuador-help-to-india या तेल खरेदीमुळे भारताला रशियन तेलाच्या तुटीची भरपाई करता येणार आहे आणि देशाला विविध पुरवठादारांकडे वळण्याची संधी मिळाली आहे.