नवी दिल्ली,
Gold and silver prices मकरसंक्रांतीच्या दिवशी सोनं-चांदीच्या बाजारात मोठी उसळी झाली आहे. सराफा बाजारातील आजच्या व्यवहारांमध्ये चांदीचे दर तब्बल 15,000 रुपये वाढले असून, सोन्याच्या दरातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. सणासुदी आणि लग्नसराईच्या काळात आलेल्या या अचानक वाढीमुळे सामान्य ग्राहकांच्या खरेदी बजेटवर मोठा दबाव पडला आहे. दुसरीकडे, पूर्वीच सोन्यात गुंतवणूक केलेल्या लोकांना ही तेजी फायदेशीर ठरली आहे.
आज (14 जानेवारी 2026) 24 कॅरेट सोन्याचे दर 10900 रुपये प्रति 100 ग्रॅम वाढून 14,36,200 रुपये झाले. 10 ग्रॅमच्या प्रमाणात हा दर 1,43,620 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 ग्रॅमसाठी 10,000 रुपयांची वाढ झाली असून, 100 ग्रॅमचा दर 13,16,500 रुपये झाला आहे. 10 ग्रॅमसाठी 1,31,650 रुपये इतका दर नोंदवला गेला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरातही 8,200 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली असून, 100 ग्रॅमसाठी 10,77,200 रुपये झाले आहेत. 10 ग्रॅमसाठी हा दर 1,07,720 रुपये इतका झाला आहे.
चांदीच्या बाजारातही मोठी तेजी झाली असून, तिचा दर 2,90,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका पोहोचला आहे. या तेजीमुळे मकरसंक्रांतीच्या सणावर सोनं-चांदी खरेदी करणार्या ग्राहकांना अधिक खर्च करावा लागेल, तर पूर्वी गुंतवणूक केलेल्या लोकांसाठी ही संधी नफा मिळविण्याची ठरली आहे.