"ती" चिमुकली सुखरूप, जन्मदात्यांचा शोध सुरू

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
लाखनी :
Lakhani chimukali prakaraṇ काळ्या रंगाच्या एका बॅगमध्ये रस्त्याच्या कडेला झुडपात टाकून दिलेल्या आठ ते दहा दिवसाच्या चिमुकलीवर झालेल्या उपचारानंतर आता ती सुखरूप आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकीकडे उपचार सुरू असताना दुसरीकडे तिच्या जन्मदात्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे लाखनी पोलिस ठाण्यांतर्गत पिंपळगाव सडक येथील शेतजमिनीला लागून एका शेतात बॅगमध्ये एका आठ ते दहा दिवसांची चिमुकली असल्याचे रस्त्याने जाणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. 13 रोजी उघडकीस आलेली ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेत स्वतः लाखनीचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे गेले आणि बाळाला ताब्यात घेत तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले होते. लाखनी येथून नंतर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे तिच्यावर उपचार करण्यात आले.
 
 
lakhani
 
Lakhani chimukali prakaraṇ बाळ धोक्या बाहेर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पोलीस जन्मदात्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी सांगितले. या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही तपास करीत आहोत असेही ते म्हणाले. नेमका हा प्रकार अनैतिक संबंधातून बाळ जन्माला आल्याने किंवा मुलगी नकोशी झाल्याने अशा चर्चांना आता उत आले आहे. 15 ते 20 दिवसांपूर्वी तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत रामपूर या गावात एका मंदिरात मृत नवजात बाळ सापडले होते. त्या प्रकरणातही अजून पर्यंत पोलिस तथ्या पर्यंत पोहोचले नसल्याने या प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.