मनरेगा योजना बंद पाडण्याचा ‘डाव’ : माणिकराव ठाकरे

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
काँग्रेस करणार राज्यव्यापी आंदोलन

यवतमाळ :
मनरेगा योजना बंद पाडण्याचा डाव केंद्र सरकारचा आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभारी (गोवा, दीव, दमण व दादरा नगर हवेली) Manikrao Thackeray माणिकराव ठाकरे यांनी बुधवार, १४ जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, अनिल गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
manrega
 
पुढे बोलताना Manikrao Thackeray  माणिकराव ठाकरे म्हणाले, १९७२ साली दुष्काळाच्या काळात शेतमजुरांना काम नव्हते. त्यावेळी जनतेकडून मागणी आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजना लागू केली. या योजनेमुळे लाखो गरजू लोकांना मजुरीचे काम मिळाले. पुढे केंद्रात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मनरेगा कायद्याद्वारे देशभरातील नागरिकांना रोजगाराचा कायदेशीर अधिकार मिळाला. या योजनेचा फायदा आजही ग्रामीण भागातील कोट्यवधी लोक घेत आहेत. ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने सुरू करण्यात आली होती.
 
 
Manikrao Thackeray  मात्र, केंद्र सरकार मोठ्या उद्योगपतींना फायदा करून देत असून मनरेगा योजना बंद करण्याचा डाव रचत आहे, तसे या योजनेचे नाव सुद्धा बदलल्याचा आरोप केला. या विरोधात काँग्रेस पक्ष देशभर आंदोलन करणार असून ‘मनरेगा बचाव संग्राम’ आंदोलन जिल्हा व गाव पातळीवर निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी जाहीर केले. या सरकारच्या या धोरणांचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून गरीब, शेतमजूर आणि कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.