आ. वानखेडेंचा धडाका
आर्वी :
आर्वी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासाठी MLA Sumit Wankhede आ. सुमित वानखेडे यांनी पुन्हा एकदा आपला शब्द खरा करून दाखवला आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत आर्वी मतदारसंघातील ५ ग्रामपंचायतींच्या बांधकामाकरिता १ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
MLA Sumit Wankhede आर्वी तालुयातील वाढोणा (ठा.), आष्टी तालुयातील खंबीत, आनंदवाडी आणि कारंजा तालुयातील धानोली व दाणापूर या पाच ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालयांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रत्येक ग्रामपंचायतीला २० लाख रुपये मिळणार असून लवकरच याठिकाणी सुसज्ज आणि आधुनिक सोयी-सुविधांनी युत शासकीय इमारती उभ्या राहणार आहेत. आ. सुमित वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे आभार मानले. मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच माझे एकमेव ध्येय असल्याचे आ. वानखेडे यांनी सांगितले.