दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत ने-आणसाठी माेफत वाहन

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
नियंत्रण कक्षाची स्थापना 

अनिल कांबळे
नागपूर, 14 जानेवारी
Nagpur Municipal Corporation Election नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क सुलभतेने बजावता यावा यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष पावले उचलली आहेत. अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या आदेशानुसार, मतदानाच्या दिवशी म्हणजेच गुरूवारी, 15 जानेवारी राेजी दिव्यांग मतदारांना त्यांच्या निवासास्थानापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी माेफत वाहन आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात गेल्या 12 दिवसांपूर्वीच प्रकाश अंधारे यांनी जनहित याचिका दाखल केली हाेती.
 
 
vahan
 
मनपाच्या आराेग्य विभागाने जारी केलेल्या अधिकृत पत्राचा विचार करताना उच्च न्यायालयाने नमूद केले की मतदानाच्या दिवशी मदतीसाठी (9175414355 ) हा विशेष व्हाॅट्सअ‍ॅप क्रमांक तसेच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवा दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गरजू मतदारांसाठी असणार आहेत.
 
 
Nagpur Municipal Corporation Election  या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने संबंधित पत्राची पाहणी केल्यानंतर आदेश दिला की सदर व्हाॅट्सअ‍ॅप क्रमांक व रुग्णवाहिका सहाय्य सुविधांची माहिती व्यापक प्रमाणात प्रसिद्ध करण्यात यावी. ही माहिती प्रींट मीडिया तसेच साेशल मीडियाच्या माध्यमातून माेठ्या प्रमाणावर प्रसारित करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले, जेणेकरून जास्तीत जास्त गरजू मतदारांपर्यंत ही माहिती पाेहाेचू शकेल. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी दाेन आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे. मनपा निवडणूक 15 जानेवारी राेजी हाेणार आहे. दरम्यान मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच वैद्यकीय अथवा हालचालीसंदर्भात मदतीची गरज असलेल्या मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रकाश अंधारे यांनी अ‍ॅड. शेजल लखानी यांच्यार्माफत दाखल केली आहे.
झाेन निहाय व्यवस्था आणि नियंत्रण कक्ष
या सुविधेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय स्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, प्रत्येक झाेनसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया संबंधित झाेनच्या झाेनल वैद्यकीय अधिकाèयांच्या देखरेखीखाली राबवली जाईल.
व्हाॅट्सअ‍ॅपद्वारे घेता येणार सुविधेचा लाभ
दिव्यांग मतदारांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 9175414355 हा व्हाॅट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतदार या क्रमांकावर काॅल करून किंवा आपले ’करंट लाेकेशन’ शेअर करून मदतीची मागणी करू शकतात. ही सेवा मतदानाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील.
झाेनल वैद्यकीय अधिकारी आणि संपर्क
लक्ष्मीनगर झाेन: डाॅ. सुनील कांबळे (9823148256)
धरमपेठ झाेन: डाॅ. वर्षा देवस्थळे (9860856756)
हनुमाननगर झाेन: डाॅ. जयश्री चन्ने (9922092546)
धंताेली झाेन: डाॅ. शीतल वांदीले (9422840562)
या सुविधेमुळे शहरातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावणे शक्य हाेणार आहे, असा विश्वास मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे.