पंचवटी चौकात कांदाचा ट्रक उलटला

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
वाहतुकीचा झाला खोळंबा
 
तिवसा, 
onion truck overturned. तिवसा शहरात १४ जानेवारी रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजता पंचवटी चौकात कांदा भरलेला ट्रक अचानक उलटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. परभणी भागातील वरणगाव येथून लाल कांद्याचा माल घेऊन कलकत्त्याच्या दिशेने अमरावतीमार्गे नागपूरकडे निघालेला डब्ल्युबी २३ ई ६५३३ क्रमांकाचा ट्रक तिवसा शहरात प्रवेश करताच पंचवटी चौकातील गतिरोधकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे अपघातग्रस्त झाला.
 

trak 
 
प्राप्त माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या ट्रकची पट्टी गतिरोधकावर अचानक तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पंचवटी चौकाच्या मध्यभागीच उलटला. ट्रकमध्ये चालक व वाहक प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कांद्याचा संपूर्ण माल रस्त्यावर पडला. या घटनेमुळे पहाटेपासूनच पंचवटी चौक परिसरात वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला. शहरात प्रवेश करणारी तसेच शहराबाहेर कामासाठी जाणारी वाहने काहीवेळ अडकल्याने प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला.
 
 
onion truck overturned. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिस स्टेशनच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचा आढावा घेऊन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. दिवसभर चाललेल्या या ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता पूर्णतः मोकळा करण्यात आला. पोलिस व स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे दुपारपर्यंत वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात यश आले. विशेष म्हणजे, पंचवटी चौक परिसरात दिवसभर विद्यार्थ्यांची, नागरिकांची, वयोवृद्धांची तसेच बसस्थानकामुळे मोठी वर्दळ असते. मात्र ही घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडल्याने त्यावेळी नागरिकांची वर्दळ नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.