पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानने राज्यस्तरीय पुरस्कारांची जाहीरात

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Padmagandha Sahitya Pratishthan इंडिया बुक आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक शुभांगी भडभडे संस्थापित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान यांच्यावतीने १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या पुरस्कारांचे वितरण १ मार्च २०२६, रविवार रोजी मराठी भाषा दिवस व प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यात केले जाणार आहे.
 
nagpur
 
यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या “राष्ट्रीय चरित्रात्मक कादंबरी लेखन गौरव पुरस्कार” (सागर भडभडे पुरस्कृत) चा पहिला मान भारती सुदामे यांना देण्यात येणार आहे. “सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार” मोहना कारखानीस यांच्या “एका” या कादंबरीला जाहीर झाला असून, पद्मगंधा विशेष पुरस्कार गायत्री मुळे (वास्तुपुरुष) आणि अलका मोकाशी (गुंतवळ) यांना देण्यात येणार आहे. आत्मचरित्र पुरस्कार भारत सातपुते यांच्या “जागरण” या आत्मचरित्राला, तर स्व. मंदाकिनी लोही समीक्षा पुरस्कार “निवडक वैदर्भीय लेखिका” (संपादक : आशा पांडे व प्रज्ञा आपटे) या ग्रंथाला जाहीर झाला आहे. Padmagandha Sahitya Pratishthan देहदान व नेत्रदान क्षेत्रातील कार्यासाठी मालिनी राजा बोबडे सामाजिक पुरस्कार नागपूरचे समाजसेवक रमेश सातपुते यांना देण्यात येणार आहे.
 
कथासंग्रह, ललित लेखन, काव्यसंग्रह, अनुवादित कादंबरी, बालसाहित्य, लघुकथा, कथा, प्रवासवर्णन, नाट्यलेखन व संतसाहित्य अशा विविध विभागांतील पुरस्कारही घोषित करण्यात आले असून, संबंधित मानकरी साहित्यिकांना सन्मानित करण्यात येणार आहे, Padmagandha Sahitya Pratishthan असे आयोजन समितीने कळविले आहे.

सौजन्य: स्वाती मोहरीर, संपर्क मित्र