नागपूर,
Jijau Jayanti छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत चालवलेल्या रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये ‘करिअर कट्टा’ उपक्रमाअंतर्गत युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर माता सरस्वती, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. संगीत विभाग प्रमुखांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्यकौशल्याचे गौरवगीत सादर केले.

कार्यक्रमात संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा लता वाघ, कार्यकारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, सर्व शाखा विभाग प्रमुख व करिअर कट्टा समन्वयक उपस्थित होते. याच कार्यक्रमाअंतर्गत बारामती येथे राज्यस्तरीय करिअर संसदेचे पाच दिवसीय अधिवेशन पार पडले. Jijau Jayanti सहभागी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांनी अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. अध्यक्षीय मनोगतात लता वाघ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरती न थांबता ध्येय निश्चित करून कौशल्य विकास, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांचा अवलंब करावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुषमा वडस्कर यांनी केले, आभार प्रा. संजय पाठक यांनी मानले आणि सांगता राष्ट्रगीताने झाली.
सौजन्य: सायली लाखे पिदळी, संपर्क मित्र