समर्थ विद्यापीठ शालेय पुरस्कार सोहळा

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Samarth University School बजाजनगर येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे श्री समर्थ विद्यापीठाच्या शालेय विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ पार पडला. कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भरभराटीत पार पडला. समर्थ भक्त अजेय बुवा रामदासी विशेष आमंत्रित होते, त्यांनी भीमरूपी स्तोत्रावर भाषण केले. या परीक्षेसाठी ३२ शाळा आणि ३००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
 
 
Samarth University School
 
पारितोषिक वितरणात शिक्षक आणि पालक उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा मिळाली. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तन, मन आणि धनाने मेहनत घेतली, तर पिटकर दांपत्य यांनी बुवांची राहण्याची सोय केली. Samarth University School आयोजिकेने सर्वांचे मनापासून आभार मानले आणि भविष्यातही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाची समाप्ती समर्थ कृपेची प्रार्थना करत झाली.
सौजन्य: स्मिता होटे, संपर्क मित्र